टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२९ ऑक्टोबर २०२२ : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन दिवसापूर्वी एका २८ वर्षीय तरुणाचा खून करून पाच आरोपी पसार होत असल्या बाबतची माहिती श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना समजताच त्यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांना माहिती दिली. त्यानंतर लगेच श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने श्रीगोंदा रेल्वे स्टेशनला धाव घेऊन ठीक चार वाजता निजामबाद ते पुणे डेमो एक्सप्रेस यागाडीची तपासणी केली असता खुनातील पाच आरोपी रेल्वेमधून श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिरली या गावातील मन्मथ ईरवंत धोंडापुरे वय २८ वर्ष याचे गावातील काही तरुणांचे किरकोळ भांडण झाले होते. या प्रकरणात गावातील माजी तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी पाटील चव्हाण यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यातील प्रमुख आरोपी बालाजी ढगे मन्मथ यांना जीवे मारण्याची धमकी देत होता दि २६ ऑक्टोंबर २०२२ रोजी संध्याकाळी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मन्मथ यास आरोपी बालाजी ढगे, बंटी ढगे, कृष्णा ढगे, गोविंद ढगे, सचिन खंडगावे, या पाचही जणांनी लाकडी दांडक्याने , कोयता, तसेच धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर प्रहार करून ठार मारले. आणि बाळासाहेब चव्हाण यांच्या शेतात फेकून दिले. पोलिसांनी पकडू नये म्हणून ते रेल्वेने पसार झाले. या घटनेची माहिती संदीप मस्के श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांना माहिती समजतात आरोपी हे पुण्याकडे जाऊ शकतात अशी माहिती समजतात त्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांना माहिती दिली जानकर व पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी विलंब न लावता १५ पोलीस कर्मचारी घेऊन श्रीगोंदा रेल्वे स्टेशन तात्काळ गाठले त्याक्षणी पुण्याकडे जाणारी निजामबाद एक्सप्रेस येताच जानकर व अभंग यांनी दोन तीन पोलिसांचे पथक तयार करून सर्व रेल्वे डब्यांची तपासणी केली असता खून करणारे पाचही आरोपी मिळून आले. त्यावेळी आरोपींनी आम्हीच खून केला आहे अशी कबुली दिली.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि महेश जानकर, पो.स.ई समीर अभंग ,स.फो विठ्ठल बडे, पो.कॉ. मुकेशकुमार बडे, भरत खारतोडे, संभाजी गर्जे , दादासाहेब टाके, किरण बोराडे, विनायक जाधव, योगेश सुपेकर, राज भोरमे, संभाजी घोडे, दादाराम म्हस्के यांनी यशस्वी कामगिरी केली.
स्त्रोत:(आप्पा चव्हाण)