टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी दि.२९ ऑक्टोबर २०२२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकारणातील धडाडी व निर्णय घेण्याची क्षमता, कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका पाहूनच आपण कार्यकर्त्यांच्या समवेत चर्चा करून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे प्रतिपादन संजीव भोरयांनी कोळगाव ग्रामस्थ व हेमंत व राजेंद्र नलगे मित्र मंडळाच्या वतीने केलेल्या सत्काराच्या वेळी केले.
- पक्ष प्रवेशाच्या वेळी कार्यकर्त्यांच्या ५० गाड्या सह ठाणे येथे जात असताना काही गाड्यांची टक्कर झाली. एक गाडी पंक्चर झाली. प्रवेशाची वेळ एक वाजता असताना तीन वाजता पोहोचलो. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही येईपर्यंत पुढील सर्व कार्यक्रम रद्द करून आम्ही पोहोचल्यानंतर आमचा पक्षप्रवेश केला व तेथेच पक्ष प्रवक्ते म्हणून जबाबदारी सोपविली त्यावेळी समाधानाने उर भरून आला व दुसरे दिवशी स्वतः समक्ष नियुक्त पत्र दिले त्याचे समाधान वाटले. असा किस्सा प्रवक्ते संजीव भोर यांनी सांगितला.
बाळासाहेबांची शिवसेना राज्य प्रवक्ते पदी म्हणून निवड झाल्याबद्दल कोळगाव ग्रामस्थांनी केलेल्या सत्कारास उत्तर देताना संजीव भोर पुढे म्हणाले की, मी आज पर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम केले परंतु मला योग्य संधी तेथे प्राप्त न झाल्याने आपण आजपर्यंत केलेल्या कामाचे कौतुक कोठे होऊ शकते व सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी निर्णय क्षमता कोणाकडे आहे याचा शोध घेतला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला .कारण आज पर्यंत ४०-५० आमदार निवडून आणण्यासाठी अनेक पिढ्या घालाव्या लागतात. आयुष्य खर्ची पडते. तेव्हा कुठे तो पक्ष स्थापित होतो. परंतु शिंदे साहेबांनी त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे शिवसेनेसारख्या पक्षातून भल्याभल्यांना बाहेर पडणे अवघड असते अशा पक्षातून ४० ते ५० आमदार सोबत घेऊन स्वतंत्र गट तयार करून धाडसाने निर्णय घेतला व सत्ता स्थापन करून एका मागोमाग एक सर्वांच्या हिताचे निर्णय धडाक्याने घेण्यास सुरुवात केली. हे पाहूनच शिंदे साहेबांच्या सोबत काम करण्याची भूमिका घेतली. माझ्या या निर्णयास ९९% कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला याचाही अभिमान वाटतो. पुढील काळात शेतकरी, गोरगरीब व सर्व घटकांसाठी काम करणार असल्याची भूमिका संजीव भोर यांनी मांडली.
- मोहरवाडी तलावामध्ये झालेले अतिक्रमण त्वरित काढण्याची व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सोसायटीचे माजी चेअरमन दामू काका साके यांनी केली.
यावेळी कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने राज्य प्रवक्ते संजीव भोर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीगोंद्याचे माजी संचालक हेमंत नलगे, सर्वज्ञ मल्टीस्टेटचे चेअरमन राजेंद्र नलगे, अहमदनगर फेडरेशनचे उपाध्यक्ष अनिल पाचपुते, माजी उपसभापती बाळासाहेब नलगे, पंचायत समिती सदस्य सुनील सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र नलगे, सुभाष लगड, माजी संचालक विश्वास थोरात, कोळगाव ग्रामपंचायतचे सरपंच अमोल काळे,माजी उपसरपंच अमित लगड, ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील नलगे , नागेश काळे पंकज उजागरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन डुबल, प्रहार संघटनेचे मिटू शिरसाठ, दामू काका साके, संभाजी लगड, सुनील लगड ,पद्माकर गाडेकर, सतीश डुबल, दिलीप शिंदे, बंटी काकडे, रोहन नलगे, चेतन जठार, हनुमंत लगड, शिवराज देशमुख, सुरेश थोरात, प्राथमिक शिक्षक संघटनेचे नारायण जठार, नारायण लगड, अनिल नलगे, नंदकुमार लगड, शिवाजी कलगुंडे, नागेश लगड, बंडू मेहेत्रे, सोसायटीचे चेअरमन नंदकुमार लगड व सर्व संचालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्रोत:(माहेशकुमार शिंदे)