साजन शुगर कारखान्याचा २० वा गळीत हंगाम शुभारंभ; पहिला हफ्ता काटा पेमेंट देणार : चेरमन साजन पाचपुते!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.३१ ऑक्टोबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील सर्व सामान्य शेतकरी व देवदैण परिसरातील लोकांच्या सहकार्याने साईकृपाची निर्मीती झाली त्यांचा त्याग विसरूण चालणार नाही. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न स्व. आण्णांनी केला. येथुन पुढेही तो सर्वानी करावा व तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सभादसादांना न्याय देण्याचे काम कारावे अशी आशा कारखान्याचे संस्थापक तथा राज्याचे मा. मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी केली. कारखान्याचा २० वा गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रम संपन्न झाले नंतर पत्रकार परिषेदेत बोलताना साजन शुगर कारखान्याचे चेअरमन साजन भैय्या पाचुपते म्हणाले की स्व. आण्णांच्या आशिवादाने साखर कारखानदारीतील कोणताही अनुभव नसताना व आर्थीक अडचण असताना मागील गाळप हंगाम यशस्वी केला व उदयाचाही गाळप हंगाम सर्व शेतकरी ऊस उत्पादक , कामगार यांचे सहकार्याने यशस्वी करू.

चालू वर्षीच्या गाळप हंगाम २०२२-२३ च्या गाळपास येणाऱ्या ऊसास प्र.मे.टन रू.२४००/- पहिला हप्ता काटा पेमेंट देणार व गाळप हंगाम २०२१-२२ च्या आलेल्या ऊसास रू.५०/- प्र.मेटन दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या सोईनुसार दिलेल्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहीती त्यांनी दिली तसेच तोडणी ३०% कमीशिन वाहतुक ३०% कमीशिनसह रोख पेमेंट दिले जाईल असेही त्यांनी सांगीतले.

यावेळी शेतकरी जितेद्र लोखंडे, जितेद्र घेगडे, सतिष काळाणे, शिवाजी साळवे, धनंजय ओव्हळ, यांचे हस्ते गव्हाणीची विधिवत पुजा करण्यात आली.

कार्यकमास संचालक दत्तात्रय (नाना) पाचपुते, साईउदयोग समुह संचालिका श्रीमती सुनंदा पाचपुते, जि,प. मा. सदस्य दिनुकाका पंधरकर, पचायत मा. सदस्य राजेंद्र पाचपुते, अमोल पवार, काष्टीचे उपसरपंच पप्पुशेठ दागंट, मा. उपसरपंच संदिप (महाराज) पाचपुते, राजापुरचे मा. उपसरपंच सचिनराव चौधरी, मढेवडगांव मा. उपसरपंच प्रकाश उंडे, सामाजिक कार्यकते नारायण टिमुणे, तसेच ऊस उत्पादक शेतकरी सभासद तोडणी वाहतुक कंत्राटदार कारखाना अधिकारी, कामगार आदि उपस्थीतीत होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जनरल मॅनेजर आर. व्ही. काळे यांनी केले तर सुत्रसंचालन जन अधिकारी एस.एन.गुंड यांनी केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा : (प्रसिद्धी पत्र)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
clear sky
38.3 ° C
38.3 °
38.3 °
9 %
6.8kmh
2 %
Thu
38 °
Fri
37 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
39 °
error: Content is protected !!