पिकनुकसान पंचनाम्यांबाबत तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन.

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.२ नोव्हेंबर २०२२ : बुधवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे पीकनुकसान पंचनाम्यांबाबत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, तालुक्यामधून आलेले शेतकरी,पत्रकार आणि शासकीय पदाधिकारी उपस्थित होते.

तालुका कृषीअधिकारी दीपक सुपेकर यांनी माहिती देताना सांगितले जिरायत शेतीसाठी १३६०० रुपये बागायत शेतीसाठी २७००० रुपये आणि फळबाग शेतीसाठी ३६००० रुपये अशी नुकसान भरपाई मिळणार आहे. उडीद आणि मूग हे पिके असणाऱ्यांना फक्त जिरायत शेती निकषांवर पीक नुकसान मोबदला मिळणार आहे बाकी श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ सर्वच बागायत शेती आहे त्यामुळे त्यांना तसा मोबदला मिळणार आहे. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे अपघाती विमा या योजनेची माहिती दिली शेतामध्ये शेतकरी काम करत असताना अपघाती मृत्यू झाल्यास हा विमा शासनाकडून रक्कम २ लाखा रुपये इतका देण्यात येतो त्याची माहिती शेतकऱ्यांनी सरकारी कार्यालयातून घ्यावी असे ते म्हणाले.

तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी माहिती देताना सांगितले श्रीगोंदा तालुक्यात पीक नुकसानीचे ७०% पंचनामे झालेले आहेत ऑक्टोबर पासून फळबागांसाठी सरसकट नुकसान भरपाई मिळेल जे अल्पभूधारक आहेत त्यांना त्यांच्या खात्यावर कमीत कमी १००० च्या पुढे रक्कम जमा होईल. रोज सहा ते सात गावांचे पंचनामे पूर्ण होत आहेत यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक हे अधिकारी काम पाहत आहेत लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांचे सहकार्य असेल तर काम चांगले होते असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस यांनी सूचना करताना सांगितले पंचनामेबाबत सर्वांना संपर्क करावा सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवावी सूचना पोहोचाव्यात यासाठी उपाययोजना कराव्यात. काही शेती ही पडीक आहे जी शेती पुणे येथील मोठ्या उद्योगपतींनी आणि व्यवसायिकांनी घेऊन ठेवलेले आहे अशे काही अपवादांना वगळता सर्वांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी असं त्यांनी सुचवले. ज्या हद्दीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत शेतकऱ्यांना शेतातून ऊस काढल्यानंतर रस्त्याने आणता येत नाही इतके रस्ते खराब झालेले आहेत. ते दुरुस्त करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आमदार बबनराव पाचपुते यांनी बोलताना सांगितले जे तहसीलदार आणि माझ्या हातात नाहीये तो विषय या ठिकाणी बोलून फायदा नाही. पूर्वीपेक्षा पीक नुकसान भरपाई रक्कम काही प्रमाणात सरकारने वाढवलेली आहे आणि त्या वाढीव दराप्रमाणे पीक नुकसान भरपाई मिळणार आहे.

घनश्याम शेलार यांनी सांगितले अनगरे या ठिकाणी कृषी अधिकारी तलाठी यांनी सरसकट पंचनामे केलेले नाहीत २७ सप्टेंबर पर्यंत आदेश नाहीत असं त्यांनी सांगितले. महावितरण ला तहसीलदार यांनी पत्र द्यावे ज्या ठिकाणी ट्रांसफार्मर जळाले आहेत तेथील शेतकऱ्यांना मागील बिलाची अट न घालता ते विनाअट बसवून देण्यात यावे. तसेच बहुतांश शेतकऱ्यांचे मुले शिक्षण घेत आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची फी माफ करावी.

यावेळी राजेंद्र नागवडे यांनी सांगितले सहा महिन्यापासून शेतकऱ्यांचे वीज बिले माफ करावीत आणि नुकसान भरपाईसाठी सरसकट बागायत क्षेत्र आशा निकषावर मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करावा. राजेंद्र मस्के यांनी सांगितले ७० टक्के प्रत्येकी मदत द्यावी शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम शासकीय अधिकाऱ्यांनी केले पाहिजे त्यामुळे त्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल

काही संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना थेट जाब विचारला अनेक वर्षांपासून पोट खराबा जमिनीचा प्रश्न प्रलंबित आहे पिक विम्याची योजना समजली नाही या योजनेचे निकष एकदा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजून सांगावेत विम्याबद्दल बोलताना शेतकरी म्हणाले प्रत्येक वर्षी पिक विमा उतरवतात परंतु मागील पाच वर्षापासून पिक विमा मिळाला नाही शेतकरी अडाणी आहेत ऑनलाईन पद्धत त्यांना समजत नाही शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे कृषी अधिकाऱ्यांना बोलताना काही शेतकरी म्हणाले बी बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांमधून यावेळी मागणी झाली.

या बैठकीला तहसीलदार मिलिंद कुलथे, आमदार बबनराव पाचपुते, तालुका कृषिअधिकारी दीपक सुपेकर, पंचायत समिती अधिकारी राम जगताप, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, राजेंद्र म्हस्के, काकडे सर, बाळासाहेब महाडिक, अनिल ठवाळ, प्रशांत दरेकर, स्मितल वाबळे तसेच तालुक्यातील संघटनांचे अधिकारी व शासकीय पदाधिकारी पत्रकार बंधू आणि शेतकरी उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!