छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या सहा विद्यार्थ्यांचा सत्कार!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि ३ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल दि १ नोव्हेंबर रोजी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी होते. यावेळी प्रास्ताविक एनसीसी प्रमुख लेफ्टनंट सतीश चोरमले यांनी करून महाविद्यालयातील एनएसएस युनिट आणि कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांना सैन्य भरती संबंधित परीक्षावर मार्गदर्शन केले. यानंतर सैन्यदलात निवड झालेल्या राहुल उदमले, सुनील पवार,लहुराज मोरे, धनंजय इथापे, प्रदीप गांगर्डे, गणेश गायकवाड, या विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आयुष्यात जिद्द ठेवली तर आपण आयुष्यातील कुठल्याही अडचणींचा सामना करू शकतो. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी पुढे बोलतांना म्हणाले की, एनसीसीही विद्यार्थ्यांना भाकर देते.१९९३ साली चिंभळे या ठिकाणी एनएसएसचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर १९९३ साली २० विद्यार्थींची एनसीसी(राष्ट्रीय छात्र सेना) सुरवात झाली. आणि पदभार माझ्याकडे आला.त्यानंतर १९९४ साली ५३ युनिट संख्येला मंजुरी मिळाली. स्वत:चं अस्तित्व उभे करण्यासाठी एनसीसी आहे. आयुष्यात ध्येयाचा पायंडा ठेवला तर आपण आयुष्याताल कुठल्याही अडचणींचा सामना करू शकतो. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते पुढे बोलतांना ते म्हणाले की, आपल्या आयुष्यात जोश आणि जिद्द असेल तर कोणत्याही अडचणींचा सामना आपण करू शकतो. जे विद्यार्थी सैन्यात दाखल झाले आहेत, त्यात आई वडिलांचं तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांच योगदान महत्त्वाच असल्याचे सांगितले. देशसेवेसाठी तरुणांनी लष्करात भरती व्हावं असेही त्यांनी आवाहन केले. गुरू विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्यासाठी महत्वाचं कार्य करतात.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारत गिरमकर यांनी तर आभार लेफ्टनंट सतीश चोरमले यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला प्राध्यापक डी. जी. कर्पे, सुरेश रसाळ, एन. एस. साबळे, व्ही सी. ईथापे,उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा 

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.7 ° C
21.7 °
21.7 °
97 %
6.3kmh
100 %
Sat
22 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!