टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.८ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील जोरदार झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी सहाय्यक मते, तलाठी संतोष तनपुरे, ग्रामसेवक होले आदींनी शेतकऱ्यांसह शेतात जाऊन पिकांची पहाणी करून पंचनामे केले.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा पाऊस झालेला असून त्यामध्ये कांदा, कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी,फळबागा तसेच अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याना पुढील पिकांसाठी शेत मशागत करायचे आहेत त्यामुळे पंचनामे लवकरात लवकर व्हावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. श्रीगोंदा तहसीलदार यांनी पंचनाम्याचा आदेश दिल्याने त्या आदेशाचे काटेकोर पालन करताना शासकीय कर्मचारी यांच्याकडून प्रत्यक्षात बांधावर जाऊन पिक पाहणी करून पंचनाम्यांना वेग आला आहे. प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना त्याचा जास्त मोबदला कसा देता येईल याचा प्रयत्न शासनाने करावा असी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.
यावेळी पंचनामे करताना कृषी सहाय्यक मते, तलाठी संतोष तनपुरे, ग्रामसेवक होले,सरपंच मिलिंद कदम, उपसरपंच रविंद्र गलांडे, बाळासाहेब दांगडे, सतीश दांगडे,गौतम दांगडे, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा : (आप्पा चव्हाण)