टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.९ नोव्हेंबर २०२२ : दि .३१ ऑक्टोबर २०२२ रोजी कृष्णा सत्यवान कुमकर रा .मढेवडगाव ता. श्रीगोंदा यांनी फिर्याद दिली होती की , दि . ३० ऑक्टोबर रोजी सायं ६ ते दि .३१ ऑक्टोबर रोजी ९ वाजनेच्या सुमारास फिर्यादीचे म्हतारपिंप्री गावचे शिवारातील शेती गट नं .१२६ मधील खोलीच्या भिंतीच्या विटा काढून तिन क्विंटल कापुस घरफोडी करुन चोरून नेला. या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस मध्ये भा.द.वि.क .४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास चालू असताना रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना खात्रीलायक बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार रविंद्र उर्फ रवि चलास भोसले रा.गणेगाव ता . शिरुर जि . पुणे याने केला आहे .
मिळालेल्या बातमीवरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी दि .६ नोव्हेंबर २०२२ रोजी सदर आरोपी हा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा येथे कापुस विक्री करीता रिक्षा घेवून येणार असल्याचे समजल्याने त्यास बाजार समितीचे बाहेर रस्त्यावर सापळा लावून ताब्यात घेतले . आरोपी रवि भोसले कडे कसून चौकशी केली असता त्याने म्हतारपिंप्री येथे घरफोडी करुन कापुस चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करुन मा.न्यायालकडुन पोलीस कोठडी रिमांड घेतला असता. आरोपीकडुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला दीड क्वींटल कापुस , गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल लोणी काळभोर पुणे येथुन चोरलेली व एक पेगो रिक्षा असा एक लाख बारा हजार रुपये रु .किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .
आरोपी रविंद्र चलास भोसले याचेवर अनेक गुन्हे दाखल आहेत.आरोपी रविंद्र उर्फ रवि चलास भोसले वय ४१ वर्षे रा .गणेगाव ता . शिरूर, जि . पुणे हा दरोडा व रॉबरी घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून तो अनेक गन्ह्यामध्ये फरार आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली सफी विठ्ठल बड़े हे करीत आहेत सदर आरोपी हे पोलीस कस्टडी मध्ये असुन त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे .
श्रीगोंदा पोलीस स्टेशन वरील उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधिक्षक राकेश ओला साहेब , अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती स्वाती भोर मँडम , उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले , पोसई समीर अभंग , सफी अंकुश ढवळे , पोना गोकुळ इंगवले , पोको प्रकाश मांडगे , पोकॉ किरण बोराडे , पोकों दादासाहेब टाके , पोकॉ अमोल कोतकर , पोकों रविंद्र जाधव यांनी केली आहे .
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा