टीम लोकक्रांती : घुगलवडगाव दि.१२ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव या ठिकाणी शेतामध्ये रस्त्याच्या कडेला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा पुल नसताना पुलाची नळी टाकल्यामुळे शेतातील पिकाचे खुप मोठे नुकसान झालेले असून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा महिलांकडून यावेळी देण्यात आला.
श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव या ठिकाणी गट नं. ६८ मध्ये रोडलगत हे क्षेत्र आहे. सदर ठिकाणी (रोड नंबर एम. डी. आर. ६३ काष्टी- श्रीगोंदा-मांडवगण रोडचा चेईनीज नंबर २१ आहे. सदर ठिकाणी पाडळे यांची खाजगी मालकीचे जमिनीमध्ये रोडलगत कोणत्याही प्रकारचा अद्यापपर्यंत पुल नव्हता व नळी पण नव्हती. तसेच सदर ठिकाणी रोड करणाऱ्या ठेकेदाराने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता जमिनीमध्ये पुलाचे काम न करता फक्त नळया टाकल्या आहेत. त्यामुळे खाजगी मालकीचे जमिनीमधील पिकाचे खुप मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच जमिनीमधील माती वाहून जात आहे.
तरी खाजगी मालकीचे जमिनीमध्ये टाकलेली नळी तात्काळ काढून घेण्यासाठी तहसीलदार स्तरावरुन आदेश व्हावेत. व सदर ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी तसेच सदर ठेकेदारावर योग्य ती कारवाई न झाल्यास आम्ही आपल्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत .अश्या आशयाचे निवेदन अर्जना सतीश पाडळे व मीना उमेश पाडळे यांनी केले तहसीलदार यांना दिले आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : आप्पा चव्हाण)