टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि. १४ नोव्हेंबर २०२२ : एकाच गावातील एकाच दिवशी तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्यानेेेेेेे गावावर शोककळा पसरली आहे. रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात काष्टीतील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात दौंड पाटस या अष्टविनायक मार्गावर झाला आहे. समजलेल्या माहितीनुसार यातील उसाच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकी चालकाला या ट्रॉलीचा अंदाज आला नसावा.
या घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी बाजारतळ येथील तीन तरुणांचा ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागुन जोरदार धडक झाल्याने मृत्यु झाला आहे. यात २६ वर्षीय ऋषिकेश महादेव मोरे, २४ वर्षीय स्वप्निल सतिष मनुचार्य व २५ वर्षीय गणेश बापु शिंदे यांचा समावेश आहे.
श्रीगोंदा शहरातील तीन मित्रांचा असाच दुर्दैवी अपघात अनन्या हॉटेल समोर काही दिवसांपूर्वी झाला होता. उसाचा ट्रेलर रस्त्यात उभा असताना व त्यास मागे रिफ्लेक्टर नसल्याने त्या गाडी चालकाला रस्त्यात उभ्या वाहनाचा अंदाज आला नाही आणि भर वेगात झालेल्या धडकेत तीन मित्रांना आपला जीव गमावा लागला होता.
यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेत जिल्हा काँग्रेसचे स्मितल भैया वाबळे, ऋषिकेश गायकवाड, टिळक भोस यांच्या नेतृत्वाखाली ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचे ट्रेलरला रिफ्लेक्टर लावण्याबाबत आंदोलन केले होते. पुन्हा अशा अपघातांमुळे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक रिफ्लेक्टर कडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्यांना मात्र, आपला जीव गमवा लागत आहे. यांना कधी जाग येणार छोट्याशा चुकीमुळे लोकांना प्राण गमवावे लागत आहेत ही गोष्ट फार दुर्दैवी आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा