शिवदुर्ग दिवाळी सन्मान सोहळा संपन्न; सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन अनेकांचा गौरव!!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१५ नोव्हेंबर २०२२ : शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ दौंड यांचे वतीने आयोजित दिवाळी गडकिल्ले स्पर्धाआणि दिवाळी रांगोळी स्पर्धेचा सन्मान सोहळा सिध्देश्वर मंदिर श्रीगोंदा येथे पार पडला. या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष एल.आय.सी.चे विकास अधिकारी अशोक गदादे हे होते.प्रमूख पाहुणे रोटरी क्लब ऑफ दौंडचे अध्यक्ष डॉ.राजेश दाते, सचिव अमीर शेख, व ग्रामविकास अधिकारी नवनाथ गोरे होते.

यावेळी स्पर्धक राधा लहानू रोडे हिने आपल्या मधुर भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य सांगितले. व उपस्थितांची वाहवा मिळविली.प्रास्तविक उपाध्यक्ष डॉ. चन्द्रशेखर कळमकर यांनी केले. सूत्रसंचलन मारूती वागस्कर, अजित दळवी यांनी केले. तर आभार शिवदुर्ग सचिव सोमेश शिंदे यांनी व्यक्त केले.

विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
गडकिल्ले स्पर्धेत दोन जिल्हातील सहा तालुक्यातील १२१स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, तर रांगोळी स्पर्धेत ६२ महिला रणरागिनींनी आपला सहभाग नोंदवला. सर्वच कलाकृती अत्यंत सुंदर व अप्रतीम होत्या.सर्व विजेत्यांना सन्मानपत्र, बुके, व कापडी पिशवी देवून सन्मान करण्यात आला. आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील बहुसंख्येने स्पर्धक उपस्थित होते.

मांडवगण गटातील कुसुम उगले यांचे सोबत अंगणवाडी सेविका कर्मचारी उपस्थीत होते.शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी २५०ट्रेक, गडकिल्ले भटकंती पूर्ण केल्याबद्दल शिवदुर्ग परिवाराच्या वतीने कविता खराडे,जालिंदर खराडे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

हा सोहळयाचे नियोजन जालिंदर पाडळे,शिवदुर्ग संचलीका सुप्रिया कुदांडे, संगीता इंगळे, महीला तालुका समन्वयक सुचित्रा दळवी, सीमा पाचपुते,नीरज पाडळे, संकेत लगड, नितीश गायकवाड, दिगंबर भुजबळ, मच्छिंद्र लोखंडे, नानासाहेब पवार, आविष्कार इंगळे यांनी यशस्वी केले.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचा भव्य किल्ले बनवा स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा २०२२ वर्ष पाचवे.शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित.दिवाळी गडकिल्ले बनवा स्पर्धा २०२२ विजेते स्पर्धक.

लहान गट…प्रथम क्रमांक.
कार्तिक मारूती साळवे. उक्कडगाव
द्वितीय क्रमांक:-राजवीर अशोक गदादे- तांदळी
तृतीय क्रमांक:- यशार्थ अमोल साळवे -ढोकराई

उत्तेजनार्थ:-
१) आरोही शरद कातोरे- उक्कडगाव
२) स्वराज गणेश अस्वर- श्रीगोंदा.
३) निरंजन अजित दळवी- लोणी.
४) समीक्षा गोरख नलगे- कोळगाव.
५) अन्वी गणेश कुदांडे- लोणी
६) विराज जगताप- हंगेवाडी

मोठागट
प्रथम क्रमांक:-
राधा लहानु रोडे- जंगलेवाडी
द्वितीय क्रमांक:-
द्रोण पुरुषोत्तम लगड – लोणी.
उदय राजे नारायण कणसे. पेडगाव
तृतीय क्रमांक:-
अनुज दत्तात्रय शितोळे- मढेवडगाव.
साईराज जालिंदर डांगे- वडाळी.
अजिंक्य मिलिंद पोटे- श्रीगोंदा.

उत्तेजनार्थ:-
१) सौरभ भापकर- घारगाव
२) श्वेता नानासाहेब पवार- येळपने
३) आरती बाळु खराडे- राळेगण.
४) हर्ष वर्धन सुहास काकडे- लोणी
५) सार्थक आदिनाथ खराडे- राळेगण.

खुलागट.
प्रथम क्रमांक:-
धनसिंग पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान सांगवी.
द्वितीय क्रमांक:-
प्रतिक संजय गायकवाड.. उक्कड गाव
तृतीय क्रमांक:-
जि. प. प्राथ. शाळा रोटी, ता. दौंड, जि. पुणे.
दिवाळी रांगोळी स्पर्धा २०२२ .

प्रथम क्रमांक:-
सौ.सुषमा मारूती साळवे. उक्कडगाव
द्वितीय क्रमांक:-
कु.आकांक्षा मारूती वागस्कर- श्रीगोंदा.
सौ.शितल अशोक गदादे. तांदळी
तृतीय क्रमांक:-
कु.वैष्णवी मिठू लंके. श्रीगोंदा.
कु.दृविका विजय काटे.श्रीगोंदा.

उत्तेजनार्थ”
१) सायली संजय गायकवाड- उक्कडगाव
२) उत्कर्शा परशुराम आरु. श्रीगोंदा.
३) सौ.पायल सोमेश शिंदे- घारगाव
४) सौ.आरती नानासाहेब पवार- येळपने.
५) कु.प्रतीक्षा सुधाकर नलगे- कोळगाव.
६) कु.आक्षिका राजेश इंगळे- श्रीगोंदा.
७) सौ.मंगल संपत खराडे- श्रीगोंदा.
८) प्रिया मोहन पवार- श्रीगोंदा.
९) वृषाली सुपेकर- कुळधरन.
शिवदुर्ग विशेष सन्मान!!अप्रतीम कलाकृती
सौ. प्रतिभा प्रमोद इथापे. एरंडोली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन,आपला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी शिवदुर्गचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत म्हणून आम्ही रोटरी क्लब ऑफ दौंडने स्वतःहुन शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या उपक्रमांना साथ देत आहोत. व हे उपक्रम देश पातळीवर पोहचविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. असे उदगार रोटरी क्लब ऑफ दौंड चे अध्यक्ष डॉ राजेश दाते यांनी यावेळी काढले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
25 ° C
25 °
25 °
70 %
7kmh
100 %
Tue
25 °
Wed
28 °
Thu
25 °
Fri
27 °
Sat
23 °
error: Content is protected !!