टीम लोकक्रांती : मढेवडगाव प्रतिनिधी : दि.१५ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे संघर्ष फाऊंडेशन व ग्रा. सदस्या देवयानी संग्राम शिंदे आयोजित दिपावली निमित्त भव्य किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गावातील लहान मुला-मुलींनी कार्यक्रमास उस्फुर्तपणे सहभाग नोंदवुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे ऐतिहासीक महत्व समाजापुढे मांडण्याचे काम त्यांनी घरोघरी किल्ले बनवुन केले. त्या ऐतिहासिक कार्यक्रमाचा गुणगौरव सोहळा आनंदात पार पडला. या स्पर्धेत १५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमाच्या आधी स्पर्धकांनी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देऊन फेरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गोरख उंडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्ते नंदनीताई वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात प्रामुख्याने सुभाष काका शिंदे, प्रमोदजी शिंदे, भगवानराव कुरुमकर, नंदकुमार साळवे, स्मितल भैय्यावाबळे, अजयजी वाबळे गणेशजी मांडे, भीमराव फरकांडे, अशोक शिंदे, लक्ष्मण मांडे, अमोलजी गाढवे,डॉ अभय शिंदे, प्रा.योगेशजी मांडे. संग्राम भैय्या शिंदे, राहुलजी साळवे, हनुमंत जाधव, शिवभक्त अनिकेतजी मांडे, प्रा.लालासो साळवे आप्पासाहेब मांडे,प्रमिलाताई शितोळे , शीतल मोरे,नवनाथ उंडे, मनोज उंडे, प्रमोद वाबळे सदा सरवदे, अन्य मान्यवर उपस्थित होते,
या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी उत्कृष्ट किल्ले बनवले होते, अत्यंत मेहनत घेतलेली दिसत होते. त्याचे प्रामुख्याने पारितोषिक वितरण करण्यात आले ते खालील प्रमाणे
१)अनुज दत्तात्रय शितोळे(नळदुर्ग) प्रथम ३३३३ रुपये
२)शिंदे प्रज्वल योगेश (जंजिरा) २२२२ रुपये
३)साळवे स्वरूप बापूसो.(बहादूरगड)११११ रुपये
४) मांडे तन्मय संतोष(सिंधुदुर्ग)
५)साळवे श्रेयस सचिन.
असे क्रमांक देण्यात आले त्याच उत्तेजनार्थी प्रथमेश मांडे, राजलक्ष्मी उंडे, शेडगे ओंकार, बुलाखे ओंकार, गायकवाड प्रणव, उंडे अर्थव , बनकर आयर्न, गाढवे अनुज, अजिंक्य वाबळे, हर्ष गुगळे, यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.यावेळी उपस्थित मध्ये अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यात डॉ अभय शिंदे यांनी किल्याविषय मार्गदर्शन केले, प्रथम विजेता अनुज शितोळे याने आपल्या किल्याविषय माहिती सांगितली,सर्व सहभागी स्पर्धकांनी सन्मान चिन्ह देण्यात आले,
या कार्यक्रमाचे आभार अभय गुंड यांनी केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : गोरख उंडे)