पिंपळगाव पिसा येथे कायदा व सुव्यवस्थेत विद्यार्थ्यांचा सहभाग या विषयावर पो. नि. रामराव ढिकले यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन!

टीम लोकक्रांती : पिंपळगाव पिसा दि.१६ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोजी कुकडी एज्युकेशन सोसायटीच्या सावित्रीबाई कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी श्रीगोंदा तालुक्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले साहेब यांचे ‘कायदा व सुव्यवस्थेत विद्यार्थ्यांचा सहभाग ‘या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढिकले साहेब यांनी सुरुवातीला महाराष्ट्रभर केलेल्या प्रशासकीय सेवेचा अनुभव सांगून वेगवेगळ्या कायद्याची सखोल माहिती सांगितली व आपल्या देशाचा विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयातील तरुणांनी घेतली पाहिजे असे मत यांनी व्यक्त केले.आपल्या देशाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे अनेक अडचणी येतात यावर उपाय म्हणजे कायदा व सुव्यवस्था त्यामुळे समाजाचे जीवन सुखकर करण्याचे प्रयत्न पोलीस विभाग करत असतो,सुव्यवस्था बिघडली की कायद्याची अंमलबजावणी करावी लागते.महाविद्यालयातील तरुणांनी दंगली,मोर्चा यामध्ये सहभागी होऊ नये स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे कारण आज अनेक सुविधा उपलब्ध आहेत घरी बसून आपण यशस्वी होऊ शकता असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृत केला, विद्यार्थ्यांनी व्यसन व गुन्हेगारी या पासून दूर राहून अभ्यास करणे आवश्यक आहे आज अनेक साधने उपलब्ध आहेत त्याचा फायदा घ्या व आपले जीवन आनंदी बनवा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या विश्वस्त डॉ.सौ.प्रणोतिमाई राहुलदादा जगताप पाटील ह्या आवर्जून उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुमचे वय अभ्यासाचे आहे अभ्यास करा मुलींनी लगेच लग्न करू नका एखादी डिग्री घ्या व नंतर बाहेर पडा अनेक क्षेत्रात तुम्हाला संधी आहेत पण हे करत असताना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा,आपल्या आसपास घडणाऱ्या वाईट घटना पासून दूर रहा, ज्यांना मदत आवश्यक आहे अशांना जरूर मदत करा,आपले भविष्य आपणच घडवा आणि हे करत असताना आपल्या आई वडीलांना कधीही विसरू नका तुमची ओळख तुम्हीच निर्माण करा असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के.ढगे व उपप्राचार्य डॉ.शांतीलाल घेगडे यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस.आर.दुधकवडे यांनी केले या कार्यक्रमासाठी रेणुका देवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दरेकर सर,महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागाचे विभाग प्रमुख,प्रत्रकार शिंदे,गायकवाड साहेब,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन.डी. शितोळे यांनी केले तर आभार दरेकर सर यांनी मानले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : आप्पा चव्हाण)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!