टीम लोकक्रांती : मढेवडगाव प्रतिनिधी दि.१६ नोव्हेंबर २०२२ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या संलग्न असलेले श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान,घारगाव संचलित साईकृपा कृषि महाविद्यालय ,घारगाव तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर,येथील कृषी कन्या नवले स्नेहल , पुराणे वृषाली , सहेर सय्यद , शेजाळ रेणुका यांनी तांदळी, तालुका शिरूर , जिल्हा पुणे, येथे या गावात शून्य ऊर्जा थंड कक्ष या प्रात्यक्षिकाचे आयोजन केले.
या प्रात्यक्षिकामध्ये कृषी कन्यांनी शून्य ऊर्जा थंड कक्षाचे त्या गावातील शेतकऱ्यांना महत्त्व पटवून दिले.तसेच शून्य ऊर्जा थंड कक्ष प्रत्यक्षात तयार करून दाखवले व ते कसे वापरावे हेही शेतकऱ्याना समजावून सांगितले याच बरोबर कृषीकन्यांनी शून्य ऊर्जा थंड कक्षाची घ्यावयाची काळजी जसे की कक्षावर थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नये यासाठी सावलीची जागा निवडावी , शीत कक्ष नेहमी स्वच्छ ठेवावा , कुजलेली फळे व भाज्या वेळीच काढून टाकाव्यात ही माहिती समजावून सांगितली.
या प्रात्यक्षिकास ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा भरभरून व उत्तम प्रतिसाद लाभला. या प्रात्यक्षिकास साईकृपा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के .एच.निंबाळकर कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.बी.जाधव व आर. एस . गोंधळी, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस.एस.बंडगर व विषय विशेषज्ञ प्रा. एस. ए. औटी यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय पानसरे व सचिव ए.डी.पानसरे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. व या कार्यक्रमास तांदळी गावचे समस्थ ग्रामस्थ शेतकरी विद्यार्थी उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : गोरख उंडे)