टीम लोकक्रांती : मुंबई दि.१६ नोव्हेंबर २०२२ : आझाद मैदान मुंबई येथे १० ऑक्टोंबर पासून आघोषीत ज्युनिअर कॉलेज, शाळा व सन २०१२-१३च्या नैसर्गिक वाढ तुकड्या निधिसह घोषित करण्यासाठी महाआक्रोष आंदोलन चालू आहे.या आंदोलनाचे नेतृत्व प्रा. भारत जामनिक, प्रा. संजय रंगारी, प्रा. बबन पाटिल येवले व प्रा. बाबासाहेब नागरगोजे करत आहेत.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळीच्या दरम्यान असे सांगितले होते की १५ नोव्हेंबर रोजी आघोषीत कॉलेज, शाळा व सन २०१२-१३च्या नैसर्गिक वाढ तुकड्या यांच्या याद्या घोषित करतो पण जे आंदोलन चालू आहे ते मागे घ्या परंतु केसरकर साहेबांनी आपला शब्द पाळला नाही.राज्यभरातून हजारो आघोषीत बिनपगारी शिक्षक बांधव निर्णय ऐकण्यासाठी आझाद मैदानावर जमा झालेले आहेत परंतु त्यांची घोर फसवणूक होत आहे.
परिणामी आझाद मैदानावरील आंदोलक शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलनाला आज १६ तारखेपासून सुरुवात केली आणि निर्णय झाल्याशिवाय माघार नाही.
आतातरी मायबाप सरकार बिनपगारी शिक्षक हा शिक्का पुसेल अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य ओबिसी शिक्षक नेते प्रा. पांडुरंग भोपळे यांनी यावेळी व्यक्त केली.
आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व आघोषीत आंदोलक शिक्षकांच्या नजरा लागल्या आहेत अशी माहिती प्रा. पांडुरंग भोपळे यांनी दिली.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा