टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी : दि.१७ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील जनता विद्यालयाच्या खेळाडूंनी परिक्रमा शैक्षणिक संकुलात संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत यश प्राप्त केले आहे .
यामध्ये १७ वर्ष वयोगटात समीर सय्यद याने ७१ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकवला तर कुणाल रंधवे याने ४८ किलो वजनगटात व अक्षय माने याने ३८ किलो गटात द्वितीय क्रमांक मिळवला .
इतर सहभागी तीन खेळाडूंनी चांगला खेळ केला . पै. रोहन रंधवे सर यांनी पंच म्हणून काम पाहिले.
समीर सय्यद याची अहमदनगर जिल्हास्तर कुस्ती स्पर्धेसाठी तालुक्यातून निवड झाली आहे, यावेळी उपस्थित परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह बबनराव पाचपुते यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक हरिश्चंद्र शिंदे, दत्तात्रय दळवी, राजू गावित, गोरख घोडे, नवनाथ पवार यांनी मार्गदर्शन केले . या यशाबद्दल मुख्याध्यापक पंडीत घोंगडे, पर्यवेक्षक सुनिल शिंदे सर यांनी कौतुक केले आहे .
विद्यालयाच्या या यशा चबद्दल माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच यशस्वी खेळाडूंचे स्थानिक स्कूल कमिटी ,शाळा व्यवस्थापन समिती ,शिक्षक पालक संघ , ग्रामस्थ सर्वांनी अभिनंदन केले आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : नंदकुमार कुरुमकर)