टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि.१७ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथे महात्मा फुले कृषि विद्यापठांतर्गत साईकृपा कृषि महाविद्यालय, घारगाव येथील कृषि दुतांनी एकात्मिक किड आणि रोग व्यवस्थापनाच्या चर्चासत्राचे आयोजन केले.
यावेळी कृषिदुत कृष्णकांत फडतरे याने एकात्मिक किड व रोग व्यवस्थापना वरील विविध प्रकारच्या पद्धती कशा अवलंबवायच्या याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कृषिदुत सौरभ पवार, किरण पेलमहाले, संकेत राजोळे, हर्षद पवार यांनी विविध प्रकारची शेतकऱ्यांना माहिती दिली. या चर्चासत्रास प्रा. साळुंखे मॅडम तसेच प्रा. भोसले मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या चर्चासत्राचा मा. उपसरपंच रामचंद्र बोबडे व ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. गोंधळी सर आणि कार्यक्रम समनव्यक प्रा. बंडगर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : महेशकुमार शिंदे)