टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१७ नोव्हेंबर २०२२ :
छत्रपती शिवाजी चौक श्रीगोंदा येथे सकाळी ठीक ११:३० वाजता हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांकडून उत्साहात प्रतिमा पुजन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर व विधानसभा संपर्क प्रमुख संजय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुरुदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त श्रीगोंदा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात आले.
श्रीगोंदा नगरपरिषद संचलित हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे श्रीगोंदा शहर वाचनालय असे नामकरण श्रीगोंदा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे या नामकरणाचा फलक दर्शनी भागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने लावण्यात आला दिवसभरामध्ये अनेक उपक्रमाने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात येत आहे
प्रतिमा पूजन व नामकरण फलक शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी उपस्थित महिला आघाडी तालुकाप्रमुख नूतनताई पानसरे शिवसेना उप तालुका प्रमुख निलेश साळुंके सुरेश देशमुख संभाजी घोडके श्रीराम मस्के हरिभाऊ काळे गणेश लाटे शिवाजी समदडे संतोष चिकलठाणे अर्पणा चिकलठाणे जनाबाई गायकवाड चंद्रकांत धोत्रे जिजा बापू गलांडे राहुल नवले जमीर भाई शेख रोहिदास मस्के नितीन शिंदे शरद नागवडे राजू तोरडे सुनील शिंदे प्रथमेश दरोडे रघुनाथ सूर्यवंशी बाळासाहेब शिंदे सागर खेडकर ओमकार शिंदे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी सर्व अंगकृत पदाधिकारी उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : आप्पा चव्हाण)