नवोदय साठी मढेवडगाव हायस्कूलचे स्वरा दिघे व सोहम शिर्के ची निवड!

टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि.१७ नोव्हेंबर २०२२ : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मढेवडगाव तालुका श्रीगोंदा येथील इयत्ता पाचवी शिकणारी कुमारी स्वरा भगवान दिघे या विद्यार्थिनीचे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये यश मिळवल्याने दुसऱ्या यादीत निवड झाली. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कुमारी स्वरा भगवान दिघे या विद्यार्थिनीने जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल (दुसरी यादी) नुकतेच परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला. त्यामध्ये तिची नवोदय विद्यालय साठी निवड झाली. याच वर्षांमध्ये पहिल्या यादीत शिर्के सोहम अजितकुमार या विद्यार्थ्यांची ही निवड झाली होती.

या प्रवेश परीक्षेसाठी एकूण ११ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची निवड झाल्याने त्यांना टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर येथील जवाहर नवोदय विद्यालयामार्फत इयत्ता बारावी पर्यंतच्या दर्जेदार केंद्रीय पद्धतीच्या शिक्षणाबरोबरच गणवेश, वह्या आणि पुस्तके आदींची मोफत व्यवस्था केली जाणार आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख शंकर यदलोड, लक्ष्मी बोलणे, सुरसे सुमती,भगवान दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक भारत हिंगसे, पर्यवेक्षक संजय पानसरे, गुरुकुल प्रमुख वैभव काळुखे, गुणवत्ता कक्ष प्रमुख प्रणव नलगे तसेच नवनिर्वाचित रयत को-ऑपरेटिव्ह बँक सातारा चे संचालक दिलीप तुपे व प्रशांत खामकर यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्थानिक स्कूल कमिटी व ग्रामस्थांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : महेशकुमार शिंदे)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!