टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१७ नोव्हेंबर २०२२ : अग्नीपंखने श्रीगोंदेकरांची प्रेरणा सायकल वारी आदर्श कृषी उद्योग मंदीरी या उपक्रमातर्गत श्रीगोंदा ते सोमेश्वर ९० किमी ची सायकल वारी काढून देशातील मशरुम उद्योगातील आयडॉल उद्योजक आर एन शिंदे व आदर्श उद्योजिका आशालता आर शिंदे सुवर्ण पदक विजेती खेळाडू अश्विनी दळवी यांना सलाम केला.
हा सन्मान बारामतीचे पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांचे हस्ते करण्यात आला.
पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे म्हणाले आर एन शिंदे हे बारामतीतील टाटा आहेत असे आदर्श उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी श्रीगोंदेकरांची प्रेरणा सायकल वारी आदर्श कृषी उद्योग मंदीरी आली की ही कौतुकाची बाब आहे.
सुनील महाडीक म्हणाले कि मला घडविणाऱ्या मातेचा अग्नीपंख फौंडेशनने सन २०१६ मध्ये आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मान केला होता हे मी आयुष्यभर विसरु शकत नाही अग्नीपंखचे सर्व उपक्रम विद्यार्थी व शाळांच्या दृष्टीने प्रेरणादायी आहेत.
बाबुलाल पडवळ यांनी आर एन शिंदे यांनी मशरुम उद्योगात केलेली कांन्ती आणि राबवलेले उपक्रम याची माहिती दिली. अश्विनी दळवी हीने मी कशी घडली याची माहिती दिली.
प्रास्ताविक विठोबा निंबाळकर यांनी केले यावेळी प्राचार्य डॉ देविदास वायदंडे उद्योजक संजय शिंदे यांनी स्वागत केले. सुत्रसंचलन शरद मचाले तर आभार पत्रकार संतोष शेंडकर यांनी मानले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : गोरख उंडे)