टीम लोकक्रांती : मढेवडगाव प्रतिनिधी : दि.१८ नोव्हेंबर २०२२ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न श्री दत्तकृपा शैक्षणिक व कृषि ग्रामविकास प्रतिष्ठान , घारगाव संचलित साईकृपा कृषि महाविद्यालय , घारगाव तालुका श्रीगोंदा,जिल्हा अहमदनगर, येथील कृषी कन्या नवले स्नेहल , पुराणे वृषाली , सहेर सय्यद , शेजाळ रेणुका यांनी तांदळी, तालुका शिरूर , जिल्हा पुणे, येथे पीक उत्पादनातील सूक्ष्म पोषक घटकांची भूमिका आणि महत्त्व याविषयी गटचर्चाचे आयोजन केले.
यामध्ये कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना सूक्ष्म पोषक घटकाचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये त्यांनी बोरॉन, जस्त, कॅल्शियम, लोह,मॅग्नीज मॅग्नेशियम, मॉलिब्डेनम या घटकांची माहिती समजावून सांगितली आणि सूक्ष्म घटकांची कमतरता असल्यामुळे झाडांमध्ये होणारा बदल याबद्दलही माहिती सांगितली.
या चर्चेस ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या प्रात्यक्षिकास साईकृपा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के .एच.निंबाळकर कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.बी.जाधव व आर. एस . गोंधळी, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस.एस.बंडगर व विषय विशेषज्ञ प्रा. के. के पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रेय पानसरे साहेब व सचिव ए.डी.पानसरे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : गोरख उंडे)