टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१८ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यात जुन ते सप्टेंबर या कालखंडात सततचा पाउस व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली तालुक्यात सरासरीच्या १६० टक्के पाउस पडल्याने शेतक-यांचे शेतातील सर्व पिके सडुन गेली त्यामुळे शेतक-यांचे हातातोंडाशी आलेला घास गेला व शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. म्हणुन १९ ऑक्टोंबर २०२२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना ओला दुष्काळ जाहिर करावा व शेतक-यांना एकरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारचे निवेदन देवुन मागणी केलेली होती. मात्र सरकारने ही मागणी मान्य न करता पंचनामे करण्याची भुमिका घेतली पंचनामे झाले परंतु शासनाने मात्र अद्याप शेतक-यांना नुकसान भरपाईपोटी आर्थिक मदत केलेली नाही.
- तसेच शेतक-यांच्या शेतातील विजपंप जुन पासुन बंद असलेने जुन ते ऑक्टोंबर या कालखंडातील शेतक-यांचे विजबिल माफ करणेत यावे अशा स्वरुपाची मागणी केलेली होती. या बाबत सरकारने कुठलाही निर्णय न करता उलट पक्षी विजबिले वसुलीसाठी रोहीत्र बंद करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. असं केल्यास महावितरण अधिकाऱ्यांना रस्त्यानेेे फिरू देणार नाही .महावितरण च्या या कृतीचा आम्ही निषेध करत आहोत. असं यावेळी घनश्यामअण्णा शेलार यांनी सांगितले
पहिल्या निवेदनात मुळातच वर्षानुवर्षे श्रीगोंदा तालुक्यातील जनता रस्त्यांचे दुरावस्तेचा त्रास अनुभवत आहे याबाबत पाठपुरावा केलेला आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे रस्ते पुर्णपणे उध्वस्त झालेले असुन रस्त्यावरील सर्वदुर खड्ड्यांमुळे जनता हैराण झालेली आहे. याबाबतही शासन व लोकप्रतिनिधी यांची उदासिनता समोर येत आहे. शेतक-यांचा हातातोंडाशी आलेला घास गेलेला असल्यामुळे ऐन दिवाळीचे तोंडावर शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला होता त्यामुळे शेतक-यांचे कुटूंबातील शिक्षण घेणारे मुलांची शैक्षणिक फि माफ करण्यात यावी.या बाबतचीही मागणी वेळोवेळी केलेली होती. मात्र याबाबतही सरकारने काहीही निर्णय केलेला नाही.
त्यातच राज्यात लंपी आजाराने थैमान घातले. त्यामध्ये शेतक-यांचे पशुधन या आजाराला बळी पडले असुन तालुक्यातील ४८९९ पशुधन बाधित झाले असुन त्यातील ३७७ पशुधन मृत पावलेले आहेत. काही जनावरांचे पोस्टमार्टेम करत लंपी आजारातुन बरे झालेनंतर मृत्यु असा अहवाल तयार केलेला असल्याने शासन पशुधन दगावलेल्या शेतक-यांना मदत देणेचे बाबतीत किती उदासिन आहे हे सिध्द होते.लंपीमुळे शेतक-यांचे पशुधनाचे बाजार बंद असुन शेतक-यांना आपले पशुधन कवडीमोल भावात विकावे लागत आहे. या सर्व गोष्टी शेतक-यांचे
अडचणीत भर घालणा-या आहेत.
वरील सर्व बाबींवरील शासनाचे लक्ष वेधणेसाठी २१ आक्टोबर २०२२ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वतीने कोळगांव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. तरी देखिल शासनास जाग आलेली नाही.शेतक-यांना दिवाळी देखील अत्यंत अडचणीत साजरी करावी लागली.आजदेखील शासनाने यापैकी कोणत्याही प्रश्नात न्याय दिलेला नाही.
तसेच गायरान व शासकिय जागेवरती गरीब माणसांनी घरे बांधलेली आहेत ती अतिक्रमणे ठरवुन डिसेंबर अखेर काढण्याचा आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी तहसिलदारांना दिलेला आहे त्यामुळे जवळपास १४०० ते १५०० गरीब लोकांचे रहाते घरे पाडली जाणार आहेत ही कृती थांबविणे गरजेचे असुन या सर्व मागणींसाठी सोमवार दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने श्रीगोंदा तहसिल कचेरी समोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.तरी कृपया या आंदोलनास कष्टकरी शेतकरी व जनतेने मोठया संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन श्रीगोंदा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये घनश्यामअण्णा शेलार यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेतला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे घनश्यामअण्णा शेलार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय आनंदकरसर, श्रीगोंदा शहर अध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस हे उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा