टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी : दि.१८ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा येथे अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय श्रीगोंदा पंचायत समिती व श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती आणि कौशल्य देवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीगोंदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे साहेब यांच्या हस्ते झाले शाळेच्या सलग दहा वर्षांपासूनच्या एसएससी बोर्ड परीक्षेतील शंभर टक्के निकालाचे शिंदे साहेब यांनी विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी शाळा राबवीत असणाऱ्या विविध कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक बी के लगड सर यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ,विविध क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पातळीवर क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या प्राविण्याबद्दल कौतुक करत स्पर्धेमध्ये हरणे किंवा जिंकणे सकारात्मकपणे खिलाडू वृत्तीने स्वीकारावे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी एपीआय जानकर साहेब ग्रँडमास्टर संजय आनंदकर,क्रीडा समितीचे अध्यक्ष बापूराव गायकवाड ,उपाध्यक्ष महेश गिरमकर आणि सतीश राव मस्के यांच्यासह तालुक्यातील विविध संघांचे क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील एकूण २६ संघांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी निरीक्षक एस पी गोलांडे मुख्याध्यापिकां नीतू दुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक कैलास ढवळे जयेश आनंदकर अक्षय कुमार शिंदे यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : नंदकुमार कुरुमकर)