राज्यातील शिंदे-भाजप सरकार ने दिले शिक्षकां साठी ११६० कोटी रुपये; शुभांगी ताई पाटील!

टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी : दि १९ नोव्हेंबर २०२२ : मागील गेल्या सुमारे १५ वर्षांपासून राज्यातील विनाअनुदानित-अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वेतनाच्या प्रलंबित प्रश्नाला अखेर शिंदे-भा ज प सरकारनेच दिला न्याय!

दि.१७ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने मंत्री मंडळात विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतना साठी ११६० कोटी रुपये अनुदानास तत्त्वतः मंजुरी देऊन विनाअनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे.

मागील गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेने राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली विनाअनुदानित शिक्षकांसाठी अनुदान मिळवण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलन करून सतत ही मागणी लावून धरली होती, व गेल्या सुमारे वर्षभरापासून अघोषित शिक्षक महासंघ याच्या माध्यमातून आझाद मैदानावर सकाळी आंदोलन सुरू होते, तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटना मिळून स्थापित शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून राज्यातील सर्व विनाअनुदानित शिक्षकांनी मागील ३६ दिवसां पासुन मुंबई आझाद मैदानावर तीव्र आंदोलन सुरू केले होते.

राज्यातील हजारो शिक्षक प्रत्यक्ष मैदानावर बसून होते तर मैदानाबाहेर मंत्री स्तरावर राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांचा पाठपुरावा सुरू होता त्याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व खानदेशी नेते माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता काल देखील माननीय गिरीश महाजन साहेब यांच्या प्रयत्नाने सदरचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येऊन रक्कम रुपये ११६० कोटी ला मंत्रिमंडळात तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील ६० हजार शिक्षकांना याचा लाभ होणार असून मागील पंधरा वर्षापासून विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या बिनपगारी शिक्षकांना यामुळे वेतन मिळणार आहे,

शिंदे भाजप सरकारच्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिक्षकांसाठी लढणाऱ्या सर्व संघटना व प्रत्यक्ष मैदानावर बसणाऱ्या सर्व शिक्षकांचे आभार मानले आहेत.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : नंदकुमार कुरुमकर)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
22.7 ° C
22.7 °
22.7 °
89 %
5.2kmh
100 %
Wed
23 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
27 °
Sun
27 °
error: Content is protected !!