आई वडिलांच्या कष्टाचं चीज करत अक्षय झाला पोलिस उपनिरीक्षक; उक्कडगाव चा सुपुत्र अक्षय महादेव महाडिक ओबीसी प्रवर्गातून राज्यात सातवा.!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.२१ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सुपुत्र अक्षय महादेव महाडिक याची राज्य उत्पादन शुल्क विभागात एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून राज्यात सातवा क्रमांक मिळवून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने उक्कडगाव ग्रामस्थ व मित्रपरिवाराने त्याची वाजत गाजत मिरवणुक काढत आनंद व्यक्त केला.

  • आई वडिलांनी माझ्यासाठी लहानपणी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी होण्याचे स्वप्न मी पाहिले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून लागेल ती मदत केल्याने आज त्यांच्या कष्टाचे चीज झाले. त्याचबरोबर गुरुजन प्रवीण ठुबे व शिंदे मॅडम तसेच सिद्धी क्लासेस चे केशव कातोरे सर यांनी विशेष मार्गदर्शन केल्याने माझे स्वप्न साकार करण्यास मदत झाली.जिद्द आणि मेहनतीच्या,चिकाटी असेल तर अशक्य काहीच नाही.
    —- अक्षय महादेव महाडिक,पोलिस उपनिरीक्षक

अक्षय लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू मुलगा होता .प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कडगाव यथे झाले. इयत्ता सातवी मध्ये असताना राज्याच्या गुणवत्ता यादीत तो चमकला होता. हे सर्व करयासाठी त्याला त्याचे गुरू प्रवीण ठुबे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तर माध्यमिक शिक्षण श्री मुंजोबा विद्यालय उक्कडगाव यथे झाले. ११ वी व १२ वी विद्याधाम प्रश्नाला शिरूर येथे झाले. लोणी प्रवरा येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी त्याने प्राप्त केली. ही पदवी असताना देखील त्याच्या डोळ्यासमोर अधिकारी होण्याचे स्वप्न होते . पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांचा आदर्श समोर ठेऊन त्याला प्रेरणा मिळाली आणि अक्षय ने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.हे सर्व शिक्षण घेत असताना त्याचे आई वडील यांचे त्याला घडवण्यासाठी करत असलेले कष्ट त्याच्या डोळ्यासमोर होते. त्यांच्या कष्टाची जाण ठेवल्याने आज अक्षयची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने आई वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.आज ओबीसी प्रवर्गातून ग्रामीण भागातील उक्कडगाव सारख्या छोट्याशा गावातील गरीब कुटुंबातील तरुण पोलीस उपनिरीक्षक झाल्याने गावाने पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली.

अक्षयच्या या निवडीबद्दल माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी चे नेते घनश्याम शेलार,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, युवाउद्योजक सचीन कातोरे, बारामती चे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, यांच्यासह उक्कडगाव चे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23 ° C
23 °
23 °
82 %
7.1kmh
93 %
Mon
28 °
Tue
25 °
Wed
24 °
Thu
28 °
Fri
27 °
error: Content is protected !!