टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२१ नोव्हेंबर २०२२ : उत्पादन वाढीसाठी आवश्यक असते ते मातीचे आरोग्य. मात्र, या महत्वाच्या बाबीकडेच शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. काळाच्या ओघात शेतीव्यवसयात अमूलाग्र बदल झाले पण आजही या मूलभुत गोष्टीकडे दुर्लक्षच होत आहे. शेतातील मातीच्या नमुन्यांचे भौतिक, रासायनिक जैविक पृथक्करण करून त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपसाणे हे महत्वाचे असते.
या साठी आम्ही ग्रामीण कृषि कार्यानुभव अंतर्गत साईकृपा कृषि महाविद्यालयाचे कृषिदुत प्रविण राऊत , ओंकार सरोदे, संकेत सावंत, श्रीराम शेजाळ , सौरभ शेळके यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण कसे करायचे याबद्दल माहिती दिली
- नेमका माती परिक्षणाचा काय होतो फायदा?
१)जमिनीच्या प्रतिनुसार पिकाची निवड व नियोजन करता येते.
२)जमिन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करता येते.
३)आवश्यक तेवढेच खत व संतुलीत खतांचा पुरवठा झाल्यामुळे आर्थिक बचत व उत्पादन क्षमता टिकून राहते.
४)प्रत्येक विभागातून १० ते २० ठिकाणाचे मातीचे नमुने घेऊन ते घमेल्यात किंवा स्वच्छ पोते यावर घ्यावे.
५)त्याचे चार समान भाग करून समोरासमोरचे दोन भाग पूर्ण घ्यावेत. अशाप्रकारे अर्धा किलो माती होईपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी.
- मातीचा नमुना घेण्याची पद्धत
१)शेतातील मातीचा नमुना योग्य पद्धतीने घेणे ही माती परीक्षण कार्यक्रमात सर्वात महत्वाची बाब आहे.
२)मातीच्या नमुन्याचे पृथक्करण अत्याधुनिक उपकरणाद्वारे केले जाते. ३)मातीचा नमुना जर त्या शेताचा प्रतिनिधीक नमुने कधीही काढता येतात. मात्र, पाऊस पडल्यानंतर, पाणी दिल्यानंतर आणि वाफसा नसताना आणि खते घातल्यानंतर लगेच नमुने काढु नयेत.
४)जमिनीत पीक घेण्याच्या हंगामापुर्वी नमुने घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी कोणते अन्नद्रव्य ही शेतजमिनीत आहेत हे समजणार आहे.
- मातीचा नमुना काढताना घ्यावयाची काळजी
१) सर्वसाधारणपणे मातीचा नमुना शेत नांगरण्यापूर्वी घ्यावा.
२) शेतात जनावरे बसण्याची जागा, खत, कचता टाकण्याच्या जागा, विहिरीचे आणि शेताचे बांध या जागेतुन मातीचे नमुने घेऊ नयेत.
३) शेतात रासायनिक खते टाकली असल्यास २ ते २ महिन्यांच्या आत नमुना घेऊ नये.
४) निरनिराळया प्रकारच्या जमिनीचे किंवा निरनिराळया शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळु नयेत.
५) झाडाखालील, पाणथळ जागेतील व माती वाहुन गेलेल्या जागेतील मातीचा नमुना घेऊ नये.
६) ठिंबक सिचन असल्यास वेटिंग बॉलच्या कडेचा नमुना घ्यावा.
- मातीच्या नमुन्याबरोबर या बाबी आहेत महत्वाच्या
मातीचा नमुना स्वच्छ कापडी पिशवीत भरून खालील माहिती भरून प्रयोगशाळेकडे पृथक्करणासाठी पाठवावा. याबरोबर शेतकऱ्यांचे नाव व पत्ता, नमुना घेतल्याची तारीख व नमुना घेतलेल्या जमिनीची खोली,गट नंबर व एकुण क्षेत्र, जमिनीचा प्रकार व खोली, मागील हंगामात घेतलेले पीक व पुढील हंगामात घेण्याचे पीक व जात याची माहितीही देणे आवश्यक राहणार आहे.
या प्रात्यक्षिकास साईकृपा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .के. एच. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.एस.गोंधळी , कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एस.बंडगर व विषय विशेषज्ञ प्रा.के.के पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा