टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी : दि.२६ नोव्हेंबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे पार पडलेल्या पावसाळी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये श्री व्यंकनाथ विद्यालय लोणी व्यंकनाथ या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटात मुले द्वितीय क्रमांक संपादन केला. तर १७ वर्षे वयोगट मुलींनी द्वितीय क्रमांक संपादन केला. १४ वर्षे वयोगट मुलींनी तृतीय क्रमांक संपादन केला. या स्पर्धेमध्ये शिवेंद्र डांगे , आर्यन काकडे ,प्रसाद काकडे, हर्षद भागवत, नवनाथ साळुंखे, रेहान इनामदार, सचिन आमले तसेच वैष्णवी गायकवाड, क्षितिजा कुदांडे, अजंता ओहोळ, वैष्णवी मदने, पूर्वा काकडे, साक्षी काकडे, कोमल शिर्के, हर्षदा मगर, ऋतुजा कांडेकर, आणि प्राजक्ता जगताप या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या खेळाडूंच्या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय सस्ते , शाळेचे क्रीडा शिक्षक तुषार नागवडे तसेच लोणी व्यंकनाथ येथील क्रीडाप्रेमी मंगेश कांबळे, सद्दाम इनामदार, गणेश काकडे, राहुल गोरखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले
या यशस्वी खेळाडूंचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष तसेच सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, संचालक डी. आर.आबा काकडे तसेच सर्व लोणी व्यंकनाथ च्या च्या ग्रामस्थांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : नंदकुमार कुरुमकर)