टीम लोकक्रांती : लिंपणगाव प्रतिनिधी : दि.२७ नोव्हेंबर २०२२ : २६ नोव्हेंबर हा दिवस पूर्ण देशभरात संविधान दीन म्हणुन साजरा केला जातो. त्यानिमित्त श्री छञपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे विद्यार्थ्यांसाठी जागृती पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शिवाजीराव नेटके यांचे “भारतीय संविधान आणि त्याचे महत्त्व” या विषयावर व्याख्यान झाले.
त्यामध्ये त्यांनी भारतीय संविधानाचा इतिहास, पार्श्वभूमी, अंमलबजावणी, भारतीय नागरिकांचे अधिकार, हक्क, न्याय, समता, बंधुभाव, कायदा, लोकशाही तसेच मतदानाचे महत्त्व, आणि नागरिक म्हणून जबाबदारी इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केले आणि उपस्थीत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.तसेच प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी हे अध्यक्ष म्हणुन लाभले होते व या प्रसंगी संविधान उद्देशिका चे वाचन करण्यात आले.
संविधान दिनानिमित्त ९ शिक्षक आणि १२६ विद्यार्थि कार्यक्रमास उपस्थीत होते. डॉ. मुकुंद भोस यांनी सूत्रसंचालन केले. वाणिज्य विभाग प्रमूख प्रा. नंदकुमार साबळे यांनी प्रास्ताविक केले.आभार प्रदर्शन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रशांत ढाके यांनी केले.
सोबतच २६/११ हा दिवस मुंबई शहरात झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना मानवंदना देऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर कार्यक्रमावेळी डॉ. संदिप कदम, डॉ. संदीप अभंग, डॉ. प्रमोद परदेशी, प्रा. लेफ्ट. सतिश चोरमले, प्रा. प्रवीणकुमार नागवडे, महीला प्रा. लोखंडे आणि शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि कार्यक्रम संपन्न झाला.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : नंदकुमार कुरुमकर)