लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याने विशाल पवार यांचा कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार..!

टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि २७ नोव्हेंबर २०२२ : कोळगाव येथील प्रतीक अशोक लगड यांचे मेव्हणे विशाल राजेंद्र पवार यांची यूपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या सीडीएस परीक्षेमध्ये लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री कोळाईदेवी मंदिरात करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे होते.

विशाल पवार यांचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर येथील रूपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. इयत्ता दहावी नंतर त्यांनी मेकॅनिकल पदविका अभ्यासक्रम नगर येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही पदवी पुणे येथील काशीबाई नवले सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये पूर्ण केली .

इंजिनिअरिंगची पदवी घेत असतानाच कोरोना काळात त्यांनी घरी असल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. मागील वर्षी पहिल्या प्रयत्नात लेखी परीक्षेमध्ये त्यांना अपयश आले परंतु अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कमकुवत बाजू ओळखून व ज्या ठिकाणी गुण कमी पडले आहेत अशा ठिकाणी भर देऊन नव्या जोमाने अभ्यास करण्यास सुरुवात केली . पुन्हा एकदा नशीब आजमवायचे त्यांनी ठरवले व १० एप्रिल २०२२ रोजी लेखी परीक्षा दिली.दुसऱ्या प्रयत्नात ते लेखी परीक्षेत पास झाले. पाच ते नऊ सप्टेंबर मध्ये त्यांनी अतिशय कठीण असणारी सीडीएस परीक्षेची भोपाळ मध्ये एस एस बी इंटरव्यू क्रॅक केली.

या इंटरव्यू मध्ये आत्मविश्वास, हजरजबाबीपणा ,वैचारिक क्षमता, तार्किक बुद्धीमत्ता, विश्लेषणात्मक बाबी स्पष्ट करण्याची क्षमता, अमूर्त कल्पना, यावर मात करून ते इंटरव्यू मध्ये सिलेक्ट झाले .त्याच वेळी त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची सीडीएस परीक्षेत निवड झाल्याचे त्यांना समजले. त्यांच्याबरोबर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनसा झाला. त्यांची ऑल इंडिया रँकिंगमध्ये इंडियन नेव्ही मध्ये २० वा क्रमांक तर इंडियन आर्मी मध्ये ६१ वा क्रमांक वर निवड होऊन त्यांची लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली.

त्यांना आता १८ महिने डेहराडून येथील आय एम ए या इन्स्टिट्यूट मध्ये पुढील प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. याशिवाय विशाल पवार यांना आयटी कंपनी कॉंगनीजंट, पुणे येथे एक डिसेंबर पासून जॉईन होण्याचाही कॉल आलेला होता. परंतु त्यांनी भारत मातेची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी जिद्दीने केलेला अभ्यास सार्थकी लागला. लहानपणापासून अतिशय कष्टात काढलेले जीवन फळास आले. ही भावना त्यांच्या व कुटुंबामध्ये निर्माण झाली.

  • ज्या तरुणांना सैन्य दलातील अधिकार व्हायचे आहे अशा तरुणांनी बारावीनंतर एनडीए परीक्षा द्यावी किंवा पदवीनंतर सीडीएस ही परीक्षा द्यावी. त्यासाठी मात्र भरपूर अभ्यास, कष्ट, आत्मविश्वास, जिद्द चिकाटी, ध्येय गाठण्याची तळमळ व सातत्य असायला हवे, आपले व्यक्तिमत्व सुधारावे आपल्यातील सकारात्मक व नकारात्मक बाबी शोधून काढाव्यात ज्या कमतरत्याच्या बाबी आहेत त्यावरती मात करावी नेतृत्व गुण विकसित करावे सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.

त्यांना या कामी त्यांची बहीण विजया लगड व मेहुणे प्रतिक अशोक लगड यांनी सर्वतोपरी मदत केली, उत्तेजन दिले, प्रेरणा दिली . ही परीक्षा पास होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे क्लास लावले नव्हते घरीच प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून स्व अभ्यासाने आपल्यातील कमतरता शोधून त्यावर मात केली.त्यामुळे विशाल पवार यांनी यशाला गवसणी घातली.
विशाल पवार यांची लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार कोळगाव येथील कोळाईदेवी मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, ग्राम सुरक्षा दलाचे गोरडे डी के, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, सर्वज्ञ मल्टीस्टेटचे चेअरमन राजेंद्र नलगे, कुकडी कारखान्याचे संचालक मच्छिंद्र लगड व सुभाष लगड, विश्वास थोरात, कोळगाव ग्रामपंचायतचे सरपंच अमोल काळे, उपसरपंच नितीन मोहारे, सदस्य विजय नलगे, अमित लगड, पंकज उजागरे, नागेश काळे, सोसायटीचे चेअरमन नंदकुमार लगड, व्हाईस चेअरमन जालिंदर साबळे, संचालक पद्माकर गाडेकर, गोरख घोंडगे, पोलीस पाटील शामराव धस , मेजर पोपट नलगे, बाळासाहेब लगड गुरुजी, जयराज लगड ,प्रकाश लगड, सतीश डुबल ,प्रतीक लगड, नितीन डुबल ,आबासाहेब लगड, नागेश लगड, ज्ञानदेव लगड, राजेंद्र लगड ,कृष्णा थोरात, गणेश गाडेकर, योगेश चंदन , उषाताई लगड,व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा
(वार्ताहर : महेशकुमार शिंदे)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.4 ° C
23.4 °
23.4 °
80 %
8.4kmh
100 %
Sun
23 °
Mon
28 °
Tue
25 °
Wed
24 °
Thu
28 °
error: Content is protected !!