टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि. २ डिसेंबर २०२२ : महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाची व इंटरनॅशनल कुस्ती संकुल तालमीची आंतरराष्ट्रीय खेळाडू पैलवान भाग्यश्री फंड हिने ३० नोव्हेंबर रोजी सह्याद्री कुस्ती संकुल वारजे माळवाडी पुणे येथे झालेल्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा निवड चाचणी मध्ये ५९ किलो वजन गटांमध्ये उल्लेखनीय कामगीरी करत १०-० च्या फरकाने कुस्त्या करत प्रथम क्रमांक मिळवला तिची २१ ते २३ डिसेंबर २०२२ रोजी विशाखापट्टण (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.
भाग्यश्री च्या या यशाबद्दल माजी मंत्री व विद्यमान आमदार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष बबनरावजी पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य महावीरशेट पटवा, माजी आमदार व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राहुलदादा जगताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के सीनियर विभागाचे उपप्राचार्य डॉ. महादेव जरे, ज्यूनियर कॉलेज उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, पर्यवेक्षक झिटे सर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना जिमखाना प्रमुख प्रा.संजय अहिवळे, शा. शि. संचालिका प्रा. बागुल कल्पना, क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव, हनुमंत फंड कोच नविन पुनिया, समाधान खांदेकर यांनी मार्गदर्शन केले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा