मांडवगणचे सुपुत्र संग्राम देशमुख यांची संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि. ६ डिसेंबर २०२२ : दि.५ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मांडवगण येथे संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड हे जिल्हा दौऱ्यावर असताना ही निवड संपन्न झाली. संभाजी ब्रिगेड रोप्य महोत्सव २८ डिसेंबर रोजी पुण्यामध्ये संपन्न होणार आहे त्यांची महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन संभाजी ब्रिगेड शाखा उद्घाटन ऑफिस उद्घाटन झंजावती दौरा चालू आहे.

काल मांडवगण येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ऑफिस उद्घाटन त्यानिमित्त संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांचे व्याख्यान झाले या कार्यक्रमाला लोकनेते आमदार पारनेर निलेश लंके साहेब राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार भाजपाचे नेते बाळासाहेब महाडिक संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष अमोलजी गव्हाणे शेतकरी आघाडी नांदेड हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते

यावेळेस लंके साहेबांचे मनोगत झाले त्यामध्ये काटकसर कशी करावी गरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत कशी करावी हे त्यांनी प्रामुख्याने युवकांना सुचवले तसेच दौंड नगर रोड धुळीचे साम्राज्य असल्याने हा रोड दुरुस्त व्हावा त्यासाठी नगर येथे उपोषणाचे नोटीस दिलेले आहे तसेच संभाजी ब्रिगेड शेतकरी प्रदेशाध्यक्ष अमोलजी गव्हाणे यांनी शेतकऱ्यांचा मालजसा चेक करून घेतात तसाच खत बियाणे हेही चेक करून शेतकऱ्यांना मिळावेत यावरती भर दिला.

तसेच संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी अहद तंजावर तहद पेशावर पर्यंत शिवरायांचे राज्य होते आता मराठा बहुजन लोकांनी बाहेर देशात जाऊन आपला ठसा उमटवावा भरपूर संधी आहे त्यामध्ये तामिळनाडू आणि पंजाब या राज्यातील लोक कसे विदेशामध्ये जाऊन आपला ठसा उमटवलेला आहे प्रवीण दादा गायकवाड यांनी सांगितले शेवटी अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा इथपर्यंत आपल्याला मजल मारायची आहे अतिशय चांगले व्याख्यान प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी दिले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदेश संघटक प्रदीप कणसे यांनी केले तसेच सूत्रसंचालन उद्धव काळापाहाड यांनी केले या कार्यक्रमाला तालुक्यातून जिल्ह्यातून असंख्य लोक उपस्थित होते पुण्यातून हर्षवर्धन मगदूम अनिल माने तसेच संभाजी ब्रिगेड टीम श्रीगोंदा हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
26.7 ° C
26.7 °
26.7 °
64 %
11kmh
95 %
Mon
27 °
Tue
26 °
Wed
25 °
Thu
29 °
Fri
30 °
error: Content is protected !!