शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात; श्रीगोंदा तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून कार्यकर्त्यांचा प्रवेश!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.०९ डिसेंबर २०२२ : शुक्रवार दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालय श्रीगोंदा तालुका येथे श्रीगोंदा शहरातील खालील मान्यवरांचा तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश करण्यात आला.

  • यामधील शिवसैनिक सुदाम मखरे,रंगनाथ डाळिंबकर, निळूभाऊ खेतमाळीस, रामभाऊ लोखंडे या लोकांचा पक्षात प्रवेश करण्यात आला.

सदर प्रवेशाचा कार्यक्रम शिवसेना तालुका उपप्रमुख रावसाहेब डांगे यांच्या विशेष प्रयत्नातून व पुढाकारातून संपन्न झाला. अनेक तरुण व ज्येष्ठ लोकांचे शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहेत या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आठशे ते नऊशे कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे कारण शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या बद्दल ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड सहानुभूतीची लाट आहे व शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे लोकसंपर्कात असणारा तरुण युवक कार्यकर्ता आहे त्यामुळे सर्वसामान्य लोक शिवसेनेमध्ये येण्यासाठी उत्साहित होत आहेत.

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निमित्ताने अनेक लोकांचे प्रवेश शिवसेनेमध्ये होणार आहेत श्रीगोंदा तालुका शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे सर्वसामान्य लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत शिवसेनेत येणारा कार्यकर्ता निस्वार्थीपणे शिवसेनेमध्ये दाखल होत असतो कारण तालुक्यामधील कुठलीही संस्था शिवसेनेच्या ताब्यात नसताना अनेक लोकांचे प्रवेश होत आहेत ही खूप मोठी आनंदाची बाब आहे हे मनोगत तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी तालुका संघटक सुरेश देशमुख, शहर प्रमुख संतोष खेतमाळीस, तालुका उपप्रमुख निलेश साळुंके, तालुका उपप्रमुख चंद्रकांत धोत्रे व इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
22.7 ° C
22.7 °
22.7 °
94 %
2.9kmh
100 %
Sat
22 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!