कुकडी व घोड कालव्यातून तातडीने पाणी सोडा – राजेंद्र म्हस्के

पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांची निवेदनाद्वारे मागणी!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१२ डिसेंबर २०२२ : कुकडी व घोड कालव्यातून शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे अशी मागणी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे.

म्हस्के यांनी निवेदनात म्हटले आहे की,माहे डिसेंबर २०२२ महिन्यातील दि.१२/१२/२०२२ तारीख गेली तरी देखील अजून देखील सल्लागार समितीची बैठक झाली नाही.तरी तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात यावा. कारण अतिवृष्टीमुळे पहिला हंगाम वायाला गेलेला आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे मशागत करून नव्याने पिके उभे केलेली आहेत,ते जगवण्यासाठी त्याला रात्रीचा दिवस करावा लागत आहे.वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुली रोहित्रे बंद करून खूप दिवस वसुली केली.आता रोहित्रे चालू आहेत. परंतु लाईट मात्र टाइमिंगला येत नाही.आली तरी ती कायमस्वरूपी राहत नाही व कायमस्वरूपी राहिली तरी लाईटचा कमी दाबा असल्यामुळे वीजपंप चालत नाहीत. शेतीतील उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. म्हणून शेतीला पाण्याची आवश्यकता आहे.

यावर्षी सर्व धरणे शंभर टक्के भरलेले आहेत. आजच्या परिस्थितीनुसार येडगाव धरण-९७%, माणिक डोह – ९०%,वडज-९७%, डिंबा-१००%, पिंपळगाव जोगे-८६% भरलेले आहे.सध्या एकूण सरासरी पाणीसाठा ९४ % इतका आहे.

सध्याची उपलब्ध पाण्याची परिस्थिती पाहता या हंगामामध्ये दोन व उन्हाळी हंगामामध्ये तीन पाणी मिळू शकतात. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन आज रोजी रोटेशन सुरू झाल्यास माहे डिसेंबर २०२२ एक रोटेशन व फेब्रुवारी २०२३ मध्ये दुसरे रोटेशन व उन्हाळी हंगामात एक असे तीन रोटेशन होऊ शकतात.याचा विचार करून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे पालकमंत्री विखे यांच्याकडे म्हस्के यांनी केलेली आहे.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
6.1kmh
100 %
Sat
24 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
27 °
Wed
28 °
error: Content is protected !!