जागतिक पर्वतदिनी हरिहर किल्लयावर शिवदुर्गची प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम!

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे वतीने ४७ वी सह्याद्रीतील गडकोट स्वच्छता मोहीम राबविली.

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.१२ डिसेंबर २०२२ : जागतिक पर्वत दिनाचे औचित्य साधून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराची ५७ वी.ट्रेकिंग मोहिम अध्यक्ष राजेश इंगळे यांचे नियोजनात नुकतीच नाशिक जिल्ह्यातील खडतर अशा किल्ले हरिहर येथे पार पडली.

आखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आणि शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे विद्यमाने जागतिक पर्वत दिन साजरा करण्यात आला. ट्रेकिंगबरोबरच महिलांचे हस्ते गडपूजन, शिवगारद व महिलांचा प्लॅस्टिक स्वच्छता मोहिमेत महिलांनी सक्रिय सहभाग नोंदविला.संस्थेच्या अहमदनगर,पुणे जिल्ह्यातील ७५ सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. यामध्ये १७ महीला रणरागिणी, ६ बालमावळे, सहभागी झाले होते.

गडावर सर्व महिलांचे हस्ते गडपुजान करण्यात आले. मारूती वागसकर सर नेहमीच प्रेरणादायी मार्गदर्शन करतात.”जय जय महाराष्ट्र माझा” हे उपस्थीत सर्वांनी गीतगायन केले.
शिवदुर्गचे संवर्धनप्रमूख संकेत नलगे,संकेत लगड यांचे मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग परिवाराची ४७ वी.प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम राबविली. यासाठी राज्य पुरातत्व खाते नाशिक, वनविभाग नाशिक यांचे परवानगीने आणि संयुक्तं वनविभाग समिती हर्षवाडी यांचे सहकार्याने ही मोहिम यशस्वी झाली.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या वतीने नेहमीच अव्हानात्मक गडकिल्ले व निसर्ग गिर्यारोहण मोहिमांचे नियोजन केले जाते. श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागांतील शिवप्रेमींना, शंभूप्रेमींना, निसर्ग पर्यटन आणि गडकिल्ले संवर्धन, ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मनापासून काम करणाऱ्या दर्दी सदस्यांना व महीला रणरागिणीना अशा संवर्धन मोहिमेत सहभागी केले जाते.

“गडकिल्ले प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम”
शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे वतीने ४७ वी सहयाद्रीतील गडकोट स्वच्छता मोहीम राबविली. यामध्ये सर्व ७५ सहभागी सदस्यांनी सहभाग नोंदवला. पाच वर्षांपासून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे वतीने गडावरील प्लॅस्टिक उचलले जात आहे.! प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सह्याद्रीतील एका गडावर ट्रेकिंग सोबत प्लॅस्टिक कचरा स्वच्छता मोहीम आयोजन केले जाते.

किल्ले हरिहर मोहिम दरम्यान गडावर पडलेला, पर्यटकांनी इतस्ततः टाकून दिलेला प्लॅस्टिक कचरा कातळ पायरीने स्वच्छता करून गडाखाली आणला. एकूण ९ गोणी प्लॅस्टिक कचरा संकलन करून गडाखाली आणला. या प्लॅस्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी हर्षवाडी येथिल वनविभाग समिती अध्यक्ष नामदेव बांगरे व वनविभागाचे ताब्यात दिला.

आमचं कार्य छोटे असेल परंतु विचार मोठा आहे. “प्लॅस्टिक मुक्त गडकिल्ले” करण्यासाठीं सातत्य पूर्वक प्रयत्न केले जातात.” छत्रपती शिवाजी महाराजांचा “शिवविचार” घेवुन आम्ही पुढें वाटचाल करत आहोत.ज्या ठिकाणी हे प्लास्टिक या मातीत गाडले जाते, तिथे नवीन झाड उगवत नाही.परिणामी हा जीवसृष्टीवर होणारा महाभयंकर आघात आहे.प्लास्टिकच्या विळख्यात सापडलेले आपले किल्ले प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे २०१८ सालापासून गडकिल्ले प्लॅस्टिक स्वच्छता अभियान प्रत्येक महिन्याला अखंडित सुरू आहे.डॉ.चन्द्रशेखर कळमकर उपाध्यक्ष शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन यांनी लोकक्रांती ला हि माहिती दिली.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
24.7 ° C
24.7 °
24.7 °
74 %
6.9kmh
100 %
Wed
29 °
Thu
26 °
Fri
25 °
Sat
23 °
Sun
25 °
error: Content is protected !!