टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : दि.२३ डिसेंबर २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा.आमदार राहुल जगताप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार यांच्या वतीने जयंतराव पाटील साहेबांचे निलंबन मागे घेण्याबाबतचे व राज्य सरकारच्या हुकूमशाही कृतीचा निषेध करण्यासाठीचे निवेदन तहसीलदार मिलिंद कुलथे साहेब यांना देण्यात आले. तसेच केलेले निलंबन तात्काळ मागे न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, गेले काही दिवसांपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार कडून होत आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नाची जसे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, राज्यातील तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे.
दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून सभागृहाचा मौल्यवान वेळ सत्ताधारी पक्षातील आमदार वाया घालवत आहेत. विरोधकांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती, तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेले बेकायदेशीर भूखंड वाटप व गैरव्यवहार प्रकरणी उपस्थित करत असलेली चर्चा टाळण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत होता, म्हणूनच जयंतराव पाटील यांनी सदनात उभे राहून “असा निर्लज्जपणा करू नका” असे शिंदे – फडणवीस सरकारला उद्देशून म्हणाले, मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचा व वचक बसविण्याच्या उद्देशाने सरकारने असे विधान अध्यक्षांना उद्देशून बोलल्याचा बनाव केला व जयंतराव पाटील यांना हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम या सरकारने केले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, ओ.बी.सी.सेल तालुकाध्यक्ष संजय आनंदकर, युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अजिमभाई जकाते, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष संदीप उमाप, विद्यार्थी तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस, सेवादल तालुकाध्यक्ष शाम जरे, बाळासाहेब दुतारे, सुदामनाना नवले, भगवान गोरखे, नगरसेवक राजाभाऊ लोखंडे, संचालक आबा पाटील पवार, आबासाहेब शिंदे, मुकुंद सोनटक्के, दैवत जाधव, पांडू पोटे, विकास बोरुडे, तुळशीराम जगताप, मंगेश सूर्यवंशी, राजू पाटील मोटे, दादासाहेब औटी, शुभम खेडकर, धनंजय औटी, बालू मखरे, नामदेव सोनवणे, आण्णा नवले, जितेंद्र पाटोळे, सागर बोरुडे, भीमराव लकडे, गोरख घोडके, विकास वागस्कर, नामदेव सोनवणे, पप्पू कोथिंबीरे आदी उपस्थित होते.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा