उक्कलगाव विद्यालयास चार खोल्यासह इतर सुविधा देणार; प्रा. संजय लाकूडझोडे

आईच्या स्मरणार्थ उद्योजक प्राध्यापक संजय लाकूडतोडे यांचे योगदान...

टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि.२७ डिसेंबर २०२२ : सामाजिक परंपरेला फाटा देत उखलगाव येथील रहिवासी व सध्या शिरूर, जि पुणे येथे असलेले बांधकाम व्यावसायिक व नीती उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रा श्री संजय विठोबा लाकुडझोडे पाटील यांनी मातोश्री कै.वेणूबाई विठोबा लाकूडझोडे पा. स्मरणार्थ स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे खंडेश्वर माध्यमिक विद्यालय, उखलगाव या शाळेस चार खोल्या ऑफिस ,स्टाफ रूम, मुला मुलींसाठी स्वच्छतागृह ,पिण्याची पाणी टाकी व अन्य सुविधा स्व:खर्चाने बांधून देणार आहे . या सर्व बांधकामास २५ ते ३० लाख रु खर्च येणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भगवानराव पाचपुते अध्यक्षस्थानी होते.

दि २५ डिसेंबर २०२२ रोजी उखलगाव येथील श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालय इमारतीच्या बांधकामात संदर्भात करण्यात मिटिंगचे आयोजित करण्यात आली होती .या प्रसंगी थोर देणगीदार उद्योजक व नीती उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रा संजय लाकूडझोडे पा सर यांचा संस्थेच्या व गावच्या वतीने सन्मान करण्यात आला .आईची स्मृती कायम राहावी. तसेच शाळेचे आपल्यावर अनंत उपकार असतात.शालेय जीवनात मिळालेले धडे करिअर मध्ये यशस्वी होण्यास उपयुक्त ठरले . जीवन घडविणारे संस्कार ज्या शाळेत मिळाले त्या शाळे प्रती आपले काही तरी देणे लागते या भावनेतून व शाळेचे ऋण फेडण्यासाठी गावातील विद्यालयासाठी चार वर्गखोल्यांसह स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची टाकी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा मनोदय व्यक्त केला.

यावेळी बापूराव ढवळे ,सुभाषशेठ वाळके ,दिलीप वाळके , सूर्यभान लाकूडझोडे , डॉ. प्रवीण वाळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गावातील प्रमुख मान्यवर सुभाष वाळके, (मा. सरपंच)सूर्यभान लाकूड झोडे .( माजी संचालक कुकडी कारखाना) विलासराव वाळके (उपसरपंच),वाळके मेजर, बाळासाहेब ढवळे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, )रमेश पवार (मा. सरपंच )सोमनाथ चंदन, सतीश काळे सर, संदीप चंदन अनिलराव ढवळे (मा.सरपंच) भाऊसाहेब लाकूडझोडे, (चेअरमन वि.का सोसा) संजय लाकूडझोडे ( मा. चेअरमन) डॉ. प्रवीण वाळके, बापूराव ढवळे (ग्रा.प सदस्य) संपतराव वाळके (ग्रा.प सदस्य) माऊली लाकूडझोडे, (मा. ग्रा प सदस्य) अशोकराव वाळके, (मा. ग्रा. प सदस्य) मोहनराव चंदन (मा. उपसरपंच), विजय जाधव, लहानु धावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे स्वागत रमेश पवार सर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रविद्र पवार सर यांनी केले .अनिल आढाव सर , संभाजी कोकाटे ,संजय गायकवाड सर ,श्रीमती साके शारदा, अशोक कांडेकर सर , सुशांत शिंदे सर ,प्रमोद मोरे सर , अमोल जाधव यांनी कार्यकम यशस्वी करण्यास मदत केली . देविदास खेडकर सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
लोकक्रांती न्यूज पोर्टल सेवा

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
21.5 ° C
21.5 °
21.5 °
93 %
7.3kmh
100 %
Sun
23 °
Mon
25 °
Tue
27 °
Wed
29 °
Thu
27 °
error: Content is protected !!