टीम लोकक्रांती : श्रीगोंदा प्रतिनिधी : ६ जानेवारी २०२३ : अनिष्ट चाली रूढी ह्या फक्त कायद्याने दूर होतील अशे नाही तर पत्रकारितेच्या माध्यमातून या रूढी बंद होण्यास मोलाची मदत होते. राष्ट्र घडवण्यासाठी पत्रकारांचे योगदान हे मोलाचे असून समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार करत असल्याने त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे असे प्रतिपादन श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांनी पंचायत समिती च्या सभागृहातील पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी अनेक विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला संतांचे कार्य जसे समाज घडवण्याचे आहे तसेच पत्रकारांचे सुध्दा आहे. ब्रिटिश काळात सुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यावेळी झालं. सध्याच्या काळामध्ये पत्रकारिता माध्यमे वाढली आहेत इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता डिजिटल पोर्टल मीडिया युट्यूब चॅनल आशा माध्यमातून पत्रकारितेचे स्वरूप विस्तृत झाले आहे.महत्वाचा विषय अभ्यास पूर्ण मांडला तर फार महत्वपूर्ण बदल होतात. पुढे बोलताना ढिकले म्हणाले की,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जात असून तालुक्यातील पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जबाबदारी निर्भीडपणे उत्तम पद्धतीने पार पाडीत आहेत.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राम जगताप यांनी बोलताना सांगितले की, आज पत्रकारांमुळे समाजातील प्रश्न समोर येत आहे त्यातून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी लोंढे यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
दरम्यानच्या काळात माजी आमदार राहूल जगताप यांच्या वतीने पत्रकारांचा मान सन्मान करणयात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनीही पत्रकारांचा सन्मान केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाचे तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे,संतोष खेतमाळीस हरीभाऊ काळे, देशमुख सर तसेच जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी तर श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या वतीने व पंचायत समिती श्रीगोंदा यांच्या वतीने सर्व पत्रकार बंधूंचा मान सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाअध्यक्ष अंकुश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद आहेर यांनी केले तर आभार दादा सोनवणे यांनी मानले.या वेळी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन