टीम लोकक्रांती : कोळगाव प्रतिनिधी : दि ६ जानेवारी २०२३ : श्री कोळाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोळगाव येथील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीचा व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये इयत्ता आठवीचे सात विद्यार्थी तर इयत्ता पाचवीच्या एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले.
इयत्ता पाचवीतील पार्थ नागेश लगड या विद्यार्थ्यांने जिल्हा गुणवत्ता यादीत तेरावा क्रमांक पटकावला आहे. इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ३३ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी १७ विद्यार्थी पात्र ठरले तर सात विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यापैकी थिटे शुभम राजाराम २०२ ,रायकर विराज महेश १९४, पंडित ईशा उमाकांत १९२, इंगवले सार्थक रतन १८८, पवार सुरज रवींद्र १८८, लगड ऐश्वर्या सचिन १८४, मेहत्रे स्नेहल नारायण १८२ या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीच्या निकालामध्ये एकूण ३१ विद्यार्थी परीक्षेत बसले होते पैकी लगड पार्थ नागेश हा एकच विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकला आहे. त्याचा जिल्ह्यात तेरावा क्रमांक आला असून गुणवत्ता यादीमध्ये ११४ व्या स्थानावर आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख श्रीमती आनंदकर ए डी, सौ पाटकुलकर एस एस तसेच मार्गदर्शक शिक्षक श्रीमती गाडेकर, श्रीमती आनंदकर, श्रीमती कळसकर एस एस, काळे एस आर, श्रीमती भोईटे एस पी, लोंढे पी.आर., जाधव पी आर. पाटकुलकर, धिव, ढाकणे व लोमटे मॅडम यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे विभागीय अधिकारी कनेरकर, उपविभागीय अधिकारी वाळुंजकर व तापकीर, प्राचार्य दांगडे एस आर, उपप्राचार्य जंगले , पर्यवेक्षक धुमाळ, माजी उपसभापती पुरुषोत्तम लगड, श्रीगोंदा कारखान्याचे माजी संचालक हेमंत नलगे, सरपंच वर्षा काळे, उपसरपंच सारिका मोहारे, सदस्य विजय नलगे, नितीन नलगे, अमित लगड, संतोष मेहत्रे, शरद लगड ,पंकज उजागरे ,नागेश काळे, अमोल काळे, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण खेतमाळीस, ओबीसी सेलचे तालुकाप्रमुख चिमणराव बाराहाते, सोसायटी चेअरमन नंदकुमार लगड, व्हाईस चेअरमन जालिंदर साबळे, सर्व संचालक, स्थानिक स्कूल कमिटीचे सर्व सदस्य , विद्यार्थ्यांचे पालक, सर्व शिक्षक वृंद व इतर ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन