टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.२२ जानेवारी २०२३ : श्रीगोंदा येथे तिरूपती चॅरिटेबल फाऊंडेशन अंतर्गत श्रीगोंदा शहरातील वडाळी रोडवर आंतरराष्ट्रीय व्यंकटेश पोदार लर्न स्कूल लवकरच सुरू होत आहे. विद्यार्थी प्रवेश कार्यालयाचे उद्घाटन दि. २२ जानेवारी रोजी संपन्न होणार असल्याची माहिती तिरुपती फाऊंडेशनचे अध्यक्ष नवनीत मुनोत, उपाध्यक्ष अतुल बगाड़े, डॉ. अनुप बगाडे, राहुल कोठारी व हितेश मुथा यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संस्थेच्या विश्वस्तांनी म्हटले आहे की, वडाळी रोडवर व्यंकटेश पोदार लर्न स्कूल च्या अद्यावत इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या वर्षी प्ले ग्रुप ते सहावी पर्यतचे सी. बी. एस. सी. पॅटर्न अंतर्गत वर्ग सुरू करण्यात येणार आहे. सुमारे सहाशे विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था होण्यासाठी २७ क्लासरुम संगणक प्रशिक्षण कक्ष तसेच खेळाचे मैदान तयार करण्यात आले आहे. या शाळेत कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता माफक दरात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची दारे खुली करून दिली जातील.
श्रीगोंद्याच्या शैक्षणिक शिरपेचात मनाचा तुरा रोवण्याचे काम येथे होईल असा विश्वास विश्वस्त मंडळाने व्यक्त केला. पोदार मॅनेजमेंट नुसार तज्ञ शिक्षक इतर कर्मचारी वर्ग नेमण्याची प्रकिया सुरू असल्याचे विश्वस्तांनी म्हटले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन