टिम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.२३ जानेवारी २०२३ : महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालय कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अहमदनगर या कार्यालयाने तात्काळ दखल घ्यावी असे पत्र संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नाना शिंदे व त्यांचे सहकारी यांनी दिनांक २३ जानेवारी रोजी नायब तहसीलदार श्रीगोंदा यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रिपेरिंगच्या कामाचा बोजवारा काही रस्त्यांची रिपेरिंग कामे जैसे थे ठेकेदार व अधिकारी यांचे दुर्लक्ष इजी मा १४१ श्रीगोंदा टाकळी रोड खड्डेमय झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालय कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अहमदनगर या संस्थेमार्फत श्रीगोंदा तालुक्यातील असंख्य रस्ते तयार झालेले आहेत त्या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे हे रस्ते बनवल्यापासून पाच वर्ष देखभाल दुरुस्ती वेळेवर होत असते सन २०२२-२३ या वर्षाची देखभाल दुरुस्तीची अद्याप तालुक्यात बरेच रस्त्यांचे काम बाकी आहे.
ठेकेदार एजन्सी चे अधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क केला असता ते खडी क्रेशर बंद आहेत बंद असल्यामुळे काम करता येणार नाही असे उत्तर देऊन मोकळे होतात मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते प्रामुख्याने शाळेतील मुलांसाठी रुग्णवाहण्यासाठी आणि शेतीमाल शहराकडे वाहतूक करण्यासाठी प्रामुख्याने या रस्त्यांचा उपयोग केला जातो या रस्त्यांमध्ये खड्डे भरपूर झाले आहेत ठेकेदार या रस्त्याकडे डोकावून ही पाहत नाहीत.रस्त्याच्या कडेला नाली खोलीकरण रस्त्याच्या कडेने गवत काट्या काढणे डांबरी रस्त्यावर खड्डे झालेले त्याचे पॅच काढणे मोठ्या ठिकाणी डांबरीचे लेयर देणे सूचना फलक रोडलगत काही ठिकाणी नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
रस्ता दुरुस्तीचे काम लवकर न झाल्यास संभाजी ब्रिगेड येत्या काळामध्ये आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही यावेळेस निवेदन देताना तालुका अध्यक्ष नाना शिंदे,तालुका उपाध्यक्ष सागर हिरडे, शहराध्यक्ष प्रवीण धुमाळ, तालुका कार्याध्यक्ष गणेश पारे, हेमंत हिरडे, शिवाजी रोहि इत्यादी मान्यवर निवेदन देताना उपस्थित होते.
लोकक्रांती वृत्तांकन