टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.३० जानेवारी २०२३ : सोमवार दि.३० जानेवारी रोजी नाशिक पदवीधर मतदार संघाचे मतदान पार पडले. त्यामध्ये एकूण ५७.६३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पडले.
पुढीलप्रमाणे मतदान झालेली सविस्तर आकडेवारी ३२२८ पुरुष मतदारांपैकी १९५१ मतदारांनी मतदान केले तर ११५७ महिला मतदारांपैकी ५७६ मतदारांनी मतदान केले. एकूण ४३८५ मतदारांपैकी २५२७ मतदारांनी (५७.६३ %) मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा अधिकार बजावला अशी माहिती श्रीगोंदा तहसील कडून देण्यात आली.
लोकक्रांती वृत्तांकन