श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक सर्व जागा बिनविरोध करण्यास अपयश!

१३ जागांपैकी २ जागा बिनविरोध निघाल्या तर उर्वरित ११ जागांसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१ फेब्रुवारी २०२३ : श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पहिल्या तसेच दुसऱ्या फळीतील नेत्यांचे जोरदार प्रयत्न सुरू होते ३१ जानेवारी रोजी माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ जागांपैकी २ जागा बिनविरोध निघाल्या तर उर्वरित ११ जागांसाठी १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

तालुका खरेदी विक्री संघाच्या १३ जागांसाठी १५२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणुक बिनविरोध करण्यासाठी तालुक्यातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. यासाठी त्यांनी जागा वाटपाचे धोरण अवलंबत पाचपुते, जगताप आणि नागवडे गटासाठी प्रत्येकी ३ जागा तर उर्वरित ४ जागांसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांच्यासाठी प्रत्येकी एक जागा असे जागा वाटप ठरले होते. १३ जागांसाठी १५२ अर्ज आल्याने शेवटच्या दिवशी अर्ज माघारी घेताना नेत्यांना मोठी कसरत करावी लागली.नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी अर्ज माघारी घेतले मात्र अनेक जण कोणत्याच नेत्याच्या जवळ नसल्याने उमेदवारी साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने केवळ दोनच जागा बिनविरोध होऊन उर्वरित अकरा जागासाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत.

अर्ज माघारीनंतर उमेदवारांची यादी खालील प्रमाणे
सर्वसाधारण गटातील उमेदवार :
मच्छिद्र ज्ञानदेव वाळके, शिपलकर शंकर एकनाथ, काळाणे सुभाष मच्छिद्र, भुजबळ भरत नानासाहेब, भापकर सुरेश मच्छिद्र, कातोरे पंडित रखमाजी , शेख बक्शुद्दीन शरुफोदीन, पाटील सुनिल पांडुरंग

वैयक्तिक मतदार गटात :
ओटी प्रदीप बजरंग, नवले विजयसिंग जयसिंग, नागवडे आदेश भुजंगराव, कोकाटे नंदकुमार मारुती, लगड धोंडिबा बापू,

अनुसुचित जाती जमाती मतदार संघात :
ताडे नंदकुमार त्रिबक, घोडके भारत सखाराम

माहिला राखीव :
पानसरे अर्चना दत्तात्रय, खेतमाळीस मथुराबाई चंद्रकांत, सुपेकर गयाबाई मच्छिद्र यांचे अर्ज राहिले आहेत तर इतर मागास प्रवर्गातील शरद जमदाडे आणि भटक्या विमुक्त जाती / जमाती मतदारसंघात सोनलकर संदिप संपत हे दोन जण बिनविरोध झाले.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.4 ° C
21.4 °
21.4 °
96 %
7.5kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!