कोळगाव मध्ये श्री कोळाईदेवी ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापना

अध्यक्षपदी दत्तात्रय जाधव यांची निवड

टीम लोकक्रांती
कोळगाव प्रतिनिधी | दि.१३ फेब्रुवारी २०२३ : कोळगाव येथे ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या अडीअडचणीच्या वर मात करण्यासाठी श्री कोळाईदेवी ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन केली. अध्यक्षपदी माजी मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव तर सचिवपदी पोपटराव खेतमाळीस यांची सर्वानुमते निवड करण्यात येऊन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

कोळगाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त तसेच छोटे मोठे व्यावसायिक असून त्यांना भेडसावत असणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी जेष्ठ नागरिक संघटना असावी या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेचे नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष दत्तात्रय जाधव, उपाध्यक्ष भास्करराव लगड, ,सचिव आबासाहेब गाडेकर,सहसचिव पोपटराव खेतमाळीस,खजिनदार अशोक पंडित, संघटक प्रकाश शिंदे,कार्यवाह कैलास जगताप, समन्वयक महेशकुमार शिंदे, असे पदाधिकारी निवडण्यात आले. तसेच कार्यकारणी सदस्यपदी मोहन कोहली, रामचंद्र लगड, तात्या लगड, दादासाहेब शिरसाट ,विनायक जगताप, बबन शेलार ,नामदेव मेहेत्रे, उत्तम बोरुडे, शहाजी नलगे, कैलास पंडित यांची निवड करण्यात आली. या बैठकीचे आभार प्रदर्शन सचिव आबासाहेब गाडेकर यांनी केले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांनी, ज्येष्ठ नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये येणाऱ्या अडचणीसाठी पाठपुरावा करणे, बँकेमध्ये पेन्शन योजना प्राधान्य क्रमाने विचार व्हावा ,विजेचा प्रश्न ,ज्येष्ठ नागरिकांना गावांमध्ये एकत्र जमण्यासाठी जागेची निवड करणे, महिन्यातून एकदा मीटिंग घेणे, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयीच्या प्रश्नांसाठी लक्ष देण्यात येणार असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पर्यटन सहली, आरोग्य शिबिरे व करणुकीचे कार्यक्रम उपलब्ध करून देण्याचा मानस जाधव यांनी बोलून दाखवला.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.3 ° C
21.3 °
21.3 °
95 %
8kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
27 °
Wed
29 °
error: Content is protected !!