श्रीगोंदा शहरात साजरा होणार भव्य दिव्य पाच दिवसीय शिवजयंती सोहळा

समता, स्वातंत्र्य, न्याय प्रस्तापित करणारा शिवरायांच्या विचारांचा होणार जागर तालुकास्तरीय शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन!

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१४ फेब्रुवारी २०२३ : शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य अशा सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये शिवजन्मोत्सव समिती श्रीगोंदा आयोजित दि.१५ फेब्रुवारी रोजी संध्या.६ वाजता शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाडा कार्यक्रम शनी चौक येथे होणार आहे. छत्रपती बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, श्रीगोंदा यांचे वतीने दि. १७ फेब्रुवारी रोजी छत्रपती मॅरेथॉन स्पर्धा जोधपुर मारुती चौक येथे घेण्यात येणार आहे. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने कम्युनिटी हॉल येथे भव्य रांगोळी स्पर्धा दुपारी १२ ते ३ दरम्यात आयोजित करण्यात आली आहे. दि. १८ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने खास महिलांची छत्रपती बाईक रॅली घेण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले सर्कल येथे दीपोत्सव करून अभिवादन करण्यात येणार आहे.

रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता शिवप्रतिमा पूजन आणि पालखी मिरवणूक श्रीगोंदा शहरातून निघणार आहे. या पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, व महाविद्यालय यांच्या विविध पथकांचा सहभाग असणार आहे. यामध्ये ढोल पथक, लेझीम पथक, झांज पथक, शिवकालीन शस्त्र विद्या, कराटे प्रात्यक्षिक इत्यादी पथके सहभागी होणार आहेत.

पालखी मिरवणूक जोधपुर मारुती चौक-दिल्ली वेस, विजय चौक, बाजारतळ वेस, आण्णा भाऊ चौक, बसस्थानक, काळकाई चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शनी चौक असा असणार आहे. वेगवेगळ्या समाजाच्या वतीने ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे.
काळकाई चौक मित्र मंडळाचे वतीने शिवप्रतिमा पूजन, श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाणच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. सायं. ४ वाजता जोधपुर मारुती चौक येथे इतिहास अभ्यासक व्याख्याते वैभव साळुंके यांचे शिव व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

त्यानंतर छत्रपती बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, श्रीगोंदा आयोजित गायन व नृत्य स्पर्धा असा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर छत्रपती मॅरेथॉन स्पर्धा, भव्य रांगोळी स्पर्धा, गायन व नृत्य स्पर्धा यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून विजेत्यांची नावे घोषित करून त्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. ६ ते ११ या वेळेत काळकाई चौक येथे लेझर शो काळकाई चौक मित्र मंडळाचे वतीने होणार आहे.

वरीलप्रमाणे शिवजन्मोत्सव समिती श्रीगोंदा, छत्रपती बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, श्रीगोंदा, जिजाऊ ब्रिगेड. श्रीगोंदा, काळकाई चौक मित्र मंडळ, आणि श्री. स्वयंभू युवा प्रतिष्ठाण श्रीगोंदा यांचे वतीने संयुक्त तालुकास्तरीय भव्य शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आणि रक्तदान शिबिरासाठी शिवप्रेमींनी आपली नावे तातडीने नोंदवावीत.

या कार्यक्रमास राज्याचे माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते, माजी आ. राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, चेअरमन राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार, महाराष्ट्र बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब नाहाटा, माजी जिल्हा बँक संचालक दत्तात्रय पानसरे, वृद्धेश्वर मल्टीस्टेटचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे, श्रीगोंदा नगरपरिषदेचे नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्षा ज्योती खेडकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच वरील सर्व कार्यक्रमास तालुक्यातील सर्व मान्यवर नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन शिवजन्मोत्सव समिती श्रीगोंदा यांचे वतीने यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.6 ° C
23.6 °
23.6 °
84 %
7.7kmh
100 %
Tue
24 °
Wed
26 °
Thu
28 °
Fri
29 °
Sat
29 °
error: Content is protected !!