टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१४ फेब्रुवारी २०२३ : श्रीगोंदा तालुक्यातील ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण विद्यालय घारगाव येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. एन एम एम एस परीक्षेत १६ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिनराव लगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये कुमारी फराटे अपर्णा , कुमारी शिंदे आरती ,कुमारी पानसरे वैष्णवी, कुमारी जगताप प्रेरणा ,कुमारी पवार वैष्णवी , कुमारी कळमकर तनिष्का ,कुमारी सांगळे कल्याणी कुमारी शिंदे प्रज्ञा ,कुमारी मेरुकर प्रियंका, डोळसकर कुणाल, पवार पियुष ,शिंदे कुणाल ,रायकर सार्थक, खामकर सिद्धेश , खामकर प्रतीक दीपक आणि पानसरे प्रतीक या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना एन एम एम एस विभाग प्रमुख भोंडवे रवींद्र यांनी गणित आणि बुद्धिमत्ता , श्रीमती मोरे एस .आर .यांनी समाजशास्त्र , हवलदार रमजान यांनी विज्ञान आणि डगळे टि.के .यांनी बुद्धिमत्ता विषयाचे मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. अनुराधाताई नागवडे , ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र शिवाजीराव नागवडे, संस्थेचे निरीक्षक बी .के . लगड सर ,नागवडे कारखान्याचे संचालक शरद राव जगताप, स्कूल कमिटीचे अध्यक्ष दादासाहेब बांदल, सामाजिक कार्यकर्ते सुभाष काका जगताप ,मुख्याध्यापक व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड सर, सकाळ समूहाचे शिवामृत सलगरे सर्व सेवकवृंद , घारगाव चे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
लोकक्रांती वृत्तांकन