टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१४ फेब्रुवारी २०२३ : श्रीगोंदा छत्रपती शिवाजी महाराज खरेदी विक्री संघाच्या रविवार दि.१२ रोजी झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत भाजप – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत बहुमत मिळवले आहे. तर दोन अपक्ष उमेदवार शिपलकर शंकर एकनाथ व वाळके मच्छिंद्र ज्ञानदेव यांनी बाजी मारत मोठ्या नेत्यांच्या सर्वपक्षीय आघाडीला दणका दिला आहे. तर दोन जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत.
रविवारी सकाळी ८ वाजता श्रीगोंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान केंद्रात मतदानाला सुरुवात होऊन सायं.४ वाजता मतदान थांबले. मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत सर्वसाधारण मतदार संघात सर्वपक्षीय आघाडीचे काळाणे सुभाष मच्छिंद्र, भापकर सुरेश मच्छिंद्र, पाटील सुनील पांडुरंग, भुजबळ भरत नानासाहेब विजयी झाले तर अपक्ष उमेदवार शिपलकर शंकर एकनाथ व वाळके मच्छिंद्र ज्ञानदेव विजयी झाले.
वैयक्तिक मतदारसंघात नागवडे आदेश भुजंगराव व कोकाटे नंदकुमार मारुती विजयी झाले. महिला प्रतिनिधी म्हणून खेतमाळीस मथुराबाई चंद्रकांत व पानसरे अर्चना दत्तात्रय या विजयी झाल्या. अनुसुचित जाती जमाती मतदारसंघात ताडे नंदकुमार त्रिंबक विजयी झाले. तर इतर मागास प्रवर्गातील जमदाडे शरद शंकर व भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघात सोनलकर संदिप संपत हे आधीच बिनविरोध म्हणून निवडून आले होते. मतदान व मोजणी शांततेत पार पडली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून अभिमान थोरात यांनी काम पाहिले.
लोकक्रांती वृत्तांकन