देशाला न्याय मिळवून देण्यासाठी लढलोय पण बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार – उपोषणकर्ता सैनिक

तपासात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली असल्याचा आरोप सैनिकाने केला आहे

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१५ फेब्रुवारी २०२३ : भारतीय सैन्यात कार्यरत असलेला सैनिक देशासाठी अहोरात्र झगडत असतो मात्र असेच एक सैनिक आपल्या बहिणीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दोन दिवसापासून तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसले आहेत त्यावेळी अनेक नेत्यांनी त्या सैनिकाला उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले त्यावेळी सैनिकाच्या तोंडून शब्द निघाले की देशाला न्याय मिळवून देण्यासाठी लढतोय पण बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असे उद्गार निघाल्याने सर्वानी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली.

श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले मात्र काही काळानंतर करणं कुंदांडे याने त्या मुलीस लग्नास नकार दिल्याने दि २५ जानेवारी २०२३ रोजी त्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरी सुसाईड नोट लिहून ठेवत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली त्यानंतर शेजारी राहणाऱ्या महिलेने हा प्रकार पहिला व त्या मुलीच्या आई वडिलांना हा प्रकार सांगीतला पोलिसांनी भादवी ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी करणं कुदांडे यावर गुन्हा दाखल केला मात्र तपासात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली असल्याचा आरोप सैनिकाने केला आहे त्यानंतर सैनिकाने आमरण उपोषणाचा इशारा दिला.

तरीही पोलीस यंत्रणेने विषय हलक्याने घेतला आणि अखेर उपोषणाचा दिवस आला आणि भारतीय सैन्यात नागालँड या ठिकाणी सेवेत असणारा सैनिक तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसला पहिल्या दिवशी अनेकांनी सैनिकाची मनधरणी केली मात्र सैनिक उपोषणवर ठाम राहिला दुसरा दिवस उजाडला तरीही सैनिकाचे उपोषण सुरु होते त्यांना भेटण्यासाठी आमदार याच्या धर्मपत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासह बाळासाहेब महाडीक, राजेंद्र म्हस्के,तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले या सर्वांनी उपोषणस्थळी जाऊन त्या सैनिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला

त्यावेळी साखळी उपोषण करण्याचे ही सर्वानी सांगितले पण सैनिक म्हणाले की प्रशासन २०दिवस काय करत होते असा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी सैनिक उपोषणावर ठाम भूमिका घेताना दिसले ते बोलताना म्हणाले की देशाला न्याय मिळवून देण्यासाठी लढलोय पण बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असे बोलताच सर्वानी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली सर्व नेत्यांना सैनिक उपोषण सोडणार नाही याची खात्री झाली आणि सर्वजण तेथून निघून गेले मात्र सैनिक उपोषणावर ठाम राहिला आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
23.6 ° C
23.6 °
23.6 °
81 %
8.3kmh
72 %
Sun
24 °
Mon
28 °
Tue
25 °
Wed
26 °
Thu
28 °
error: Content is protected !!