टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१५ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुका कार्यकारणीची नुकतीच निवड होऊन तालुकाध्यक्ष पदी चौथ्यांदा अंकुश शिंदे यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे योगेश चंदन यांची निवड करण्यात आली. या कार्यकारणीत सचिवपदी पिटर रणसिंग, सहसचिवपदी राम सोनवणे, कार्याध्यक्षपदी सुभाष शिंदे तर खजिनदारपदी दै.पुण्यनगरीचे रामदास कोळपे यांची निवड जेष्ठ पत्रकार डॉ. बाळासाहेब बळे यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा अध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली.
प्रत्येक वर्षी प्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका पदाधिकारी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताजी पाचपुते यांनी तालुकाध्यक्ष पदी दैनिक दिव्यमराठी चे अंकुश शिंदे यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड केली. तर दैनिक पुण्यनगरीचे तालुका वार्ताहर योगेश चंदन यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सचिवपदी दै.गावकरीचे पिटर रणसिंग, सह सचिवपदी राम शंकर सोनवणे, कार्याध्यक्षपदी दै.सामनाचे सुभाष शिंदे, आणि खजिनदारपदी दै.पुण्यनगरीचे रामदास कोळपे यांची बिनविरोध निवड करण्यात येऊन सर्वांना ज्येष्ठ पत्रकार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.बाळासाहेब बळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
- येणाऱ्या काळात सर्व सहकार्यांना सोबत घेऊन पत्रकार संघाच्या सदस्यांना येणाऱ्या अडचणी दूर करणार असल्याचे अंकुश शिंदे यांनी सांगितले.
यावेळी शिवाजी साळुंखे, दादा सोनवणे,अनिल तुपे, अंकुश तुपे, प्रमोद आहेर, विजय मांडे, आप्पासाहेब चव्हाण, केशव कातोरे, ज्ञानेश्वर येवले, नंदकुमार कुरुमकर, सर्जेराव साळवे, अमोल झेंडे, पंकज गणवीर आदी पत्रकार उपस्थित होते.
शिंदे यांची निवड होताच आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहूल जगताप, काष्टी सेवा संस्थेचे मार्गदर्शक कैलास पाचपुते, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश सुपेकर, श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गटनेते मनोहर पोटे, तसेच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकूश शिंदे यांनी केले असून सूत्र संचालन प्रा. केशव कातोरे यांनी केले तर आभार योगेश चंदन यांनी मानले.
लोकक्रांती वृत्तांकन