शुभांगी इश्वरे यांना शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार या पुरस्काराने सन्मानित

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१५ फेब्रुवारी २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील सौ. शुभांगी अशोक इश्वरे यांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामाबद्दल “राष्ट्रबांधणीचे शिल्पकार“ हा पुरस्कार विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

संगमनेर येथील इनरव्हील ऑफ संगमनेर यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामाबद्दल राष्ट्रबांधणीचे शिल्पकार या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक बी.जी. शेखर पाटील, माजी आमदार सुधीर तांबे, डिस्ट्रीक व्हाइस चेअरमन इनर व्हील क्लब रचना मालपाणी , इनरव्हील क्लब अॅाफ संगमनेरच्या प्रेसिडंट वृषाली कडलग , काजळे ज्वेलर्स, फटांगरे मॅडम गट शिक्षण अधिकारी संगमनेर यांच्या हस्ते या कार्यक्रमात जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याने सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
28.9 ° C
28.9 °
28.9 °
54 %
8.1kmh
90 %
Sat
31 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
25 °
Wed
28 °
error: Content is protected !!