शेतीमालांवरील वायदेबंदी उठविण्यासाठी खासदारांनी संसदेत आवाज उठवावा – स्वतंत्र भारत पार्टीने दिले खासदारांना निवेदन

खासदारांच्या संपर्क कार्यालयांसमोर निदर्शने करून परत आशा निष्क्रिय खासदारांना निवडून न देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे अशी माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी दिली आहे.

टीम लोकक्रांती
श्रीगोंदा प्रतिनिधी | दि.१७ फेब्रुवारी २०२३ : केंद्र शासनाने सात शेतीमालांवरील वायदेबंदीला एक वर्षाची मुदतवाढ दिल्यामुळे शेतीमालाचे भाव पडले आहेत. वायदेबंदी उठविण्यासाठी खासदारांनी संसदेत आवाज उठवावा अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टी व शेतकरी संघटनेने सर्व खासदारांना निवेदन देऊन केली आहे.

अन्न धान्याची महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने २०२१-२२ या वर्षात नऊ शेतीमालाच्या वायदे व्यवहाराला बंदी घातली होती. २० डिसेंम्बर २०२२ रोजी, केंद्र शासनाने सेबी मार्फत, सात शेतीमालांना डिसेंम्बर २०२३ पर्यंत वायदेबंदीला मुदतवाढ दिली आहे. गहू, तांदूळ, मूग, चना, सोयाबीन व त्याचे उपपदार्थ, मोहरी व तिचे उपपदार्थ आणि पमतेल ही बंदी घातलेली पिके आहेत. वायदेबंदीमुळे महागाई कमी होत नाही मात्र शेतकऱ्यांना मिळणार दर कमी होतो ही वस्तूस्तुती आहे.

हा निर्णय केंद्र सरकारचा आहे व ही बंदी उठविण्यासाठी संसदेत मागणी होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातून निवडून गेलेले खासदार प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात. शेतकऱ्यांची बाजू संसदेत मांडून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय करून घेणे हे त्यांचे कर्तव्य आहे. वायदेबंदीमुळे शेतकऱ्यांवर होणार्या अन्यायाची जाणीव संसदेला करून देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा असते.

स्वतंत्र भारत पार्टी व शेतकरी संघटनेने २३ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथील सेबी कार्यालयासमोर आंदोलन करून ही मागणी केली आहे. त्यानंतर कपासावरील वायदेबंदी उठविण्यात आली व कपाशीचे दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. गहू, मोहरी व चन्याचा कापनी हंगाम सुरू होत आहे. वायदेबंदी न उठाविल्यास अतिशय कमी भावात हा शेतीमाल विकावा लागणार आहे. चांगला दर मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी अद्याप सोयाबीन साठवून ठेवले आहे मात्र निर्यातबंदी, आयात शुल्कमुक्त आयती व वायदेबंदीमुळे किफायतशीर दर मिळत नाही.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व खासदारांना अशी निवेदने देण्यात आली आहेत. खासदारांनी वायदेबंदी उठविण्याबाबत संसदेत आवाज उठवावा अशी विंनती करण्यात आली आहे. दि. २४ मार्च २०२३ पर्यंत सात शेतीमलांवरील वायदेबंदी न उठविल्यास त्यानंतर या खासदारांच्या संपर्क कार्यालयांसमोर निदर्शने करून परत आशा निष्क्रिय खासदारांना निवडून न देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे अशी माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
23.9 ° C
23.9 °
23.9 °
80 %
5.3kmh
100 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
23 °
Sun
25 °
Mon
26 °
error: Content is protected !!