संततीसाठी संपत्ती जमा करण्यापेक्षा संततीच अशी घडवा ती भविष्यात जगाची संपत्ती झाली पाहिजे – शिवव्याख्याते अभिषेक उदमले

टीम लोकक्रांती
आढळगाव प्रतिनिधी | दि.१९ फेब्रुवारी २०२३ : संततीसाठी संपत्ती जमा करण्यापेक्षा संततीच अशी घडवा ती भविष्यात जगाची संपत्ती झाली पाहिजे असे गौरवोद्गार शिवव्याख्याते अभिषेक उदमले यांनी आढळगाव येथे आयोजित शिव व्याख्यानमाला सोहळ्यात काढले. यावेळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे ग्रामस्थांनी बस स्थानकावर शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते अभिषेक उदमले बोलताना पुढे म्हणाले की, शिवरायांचे मावळे राजांसाठी हसत हसत मरायला तयार होत होते, कारण प्रत्येकाला ही स्वराज्य आपलं वाटायचं आपणच या स्वराज्यासाठी लढले पाहिजे आपणच या स्वराज्यासाठी झगडले पाहिजे आणि आपणच या स्वराज्यासाठी मेले पाहिजे अशी भावना मावळ्यांची होती. त्यामुळे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे जिथं पोरं जगण्यासाठी घडवले जातात. तिथे मुलं लवकर मरतात. पण जिथे मुलं मरणासाठी तयार केली जातात ,तेथे ती मुलं मरून पण पूर्ण उरतात. हा शिवचरित्राचा सगळ्यात मोठा इतिहास आहे.

एकदा कर्मवीर भाऊराव पाटलांना देणगीच्या स्वरूपाने इमारत बांधणीसाठी खूप मोठी रक्कम एका पाटलांनी देऊ केली. परंतु त्या पाटलाने एक इच्छा व्यक्त केली की भाऊरावांनी त्यांच्या शाळेच्या इमारतीला दिलेली छत्रपती शिवरायांचे नाव बदलून माझे नाव टाकावे परंतु भाऊराव पाटील यांनी त्यांना ठणकावून सांगितले की, एक वेळेस मी माझ्या बापाच्या नावात बदल करीन पण छत्रपती शिवरायांचे नाव जे शाळेला दिले आहे. त्यात मी कधीही बदल करणार नाही. ही एक शिवरायांविषयीची आस्था होती. आदर होता. यावेळी आढळगाव पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय या शिवजयंती सोहळ्याला उपस्थित होता.

दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात सर्व शिक्षण संस्था शहरी व ग्रामीण भागामध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला. त्यामध्ये प्रामुख्याने, श्रीगोंदा, कोळगाव, श्रीगोंदा फॅक्टरी, लोणी व्यंकनाथ, पेडगाव, घारगाव, पिंपरी कोलंदर, टाकळी कडेवळीत, पिंपळगाव, काष्टी, अजूनज आनंदवाडी, शेडगाव इत्यादींसह जवळपास सर्वच प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयामध्ये उत्साही वातावरणात शिवगर्जनेसह शिवजयंती सोहळ्यानिमित्त छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवजयंती सोहळ्यानिमित्त नामवंत शिवव्याख्याते यांची व्याख्याने आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यात आला.
लोकक्रांती वृत्तांकन

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
21.4 ° C
21.4 °
21.4 °
96 %
7.5kmh
100 %
Sat
21 °
Sun
23 °
Mon
25 °
Tue
28 °
Wed
29 °
error: Content is protected !!